''इंधन दरकपात हा केवळ राजकीय स्टंट !''

पेट्रोल दर ६० रुपयांवर आणला, तरच विश्‍वास ठेवू: संकल्प आमोणकर
Sankalp Amonkar
Sankalp AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पेट्रोलचा दर 60 रुपयांवरून 100 रुपयांवर गेला आहे. सरकारला जर जनतेची एवढीच काळजी असेल तर पेट्रोल दर पुन्हा 60 रुपयांवर आणून दाखवा. तसे केले तरच आम्ही मानतो की, सरकारने लोकांच्या हितासाठी दर खाली आणले. अन्यथा ही दरवाढ अदानी, जिंदाल यांच्या स्वार्थासाठीच आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली. ("Reducing fuel prices is just a political stunt!" )

Sankalp Amonkar
मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या! खरी कुजबूज

इंधन व इतर वस्तूंच्या किरकोळ किमती कमी करणे, हा केवळ स्टंट आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन हे नाटक रचले आहे. भाजप सरकारचा हा देखावा आहे, असा आरोप आमोणकर यांनी केला. बायणा येथे मोफत होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे उद्‌घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. या शिबिरात डॉ. प्रीती चौधरी, डॉ. सुभाष राव यांनी आहार आणि आरोग्याविषयी सल्ला दिला. डॉ. योगेश देसाई यांनी रुग्णांना समुपदेशन केले. समाज कार्यकर्ते गजानंद कामत, कुमार शर्मा या शिबिरास उपस्थित होते.

Sankalp Amonkar
पंच सदस्यांऐवजी मी मतदारांवरच विसंबून : आमदार ॲड. फेरेरा

सरकारने नुकतेच नवीन राजभवन उभारणार असल्याचे जाहीर करून त्याची पायाभरणी 30 मे रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. आम्हाला दुसऱ्या राजभवनाची गरज नाही. सध्याचे राजभवन हॉटेलला देण्याचा छुपा अजेंडा असू शकतो, असा आरोपही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला.

वास्को पालिका इमारत वारसा स्थळ होती, ती आता नष्ट झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचे पुरातन फर्निचर गायब झाले आहे. या इमारतीला गळती लागली असून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष हे ठेकेदाराला दोष देत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे, असे आमोणकर म्हणाले. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शैक्षणिक कर्ज, लाडली लक्ष्मी, गृहआधार आदी योजनांचा लाभ लोकांना मिळत नाही. लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. पंचायतींचे प्रभाग आरक्षण नीट झाले नाही तर रस्त्यावर येऊ, असा इशारा आमोणकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com