RTO: फोंडा RTO ची एका वर्षात विक्रमी वसुली, वसूल केले तब्बल...

फोंडा आरटीओ पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2022 पर्यंत दंडाद्वारे 1.90 कोटी रुपये वसूल केलेय.
RTO
RTODainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण 44,925 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. 2021 मध्ये 56,988 वाहनचालकांना 71,23,150 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. फोंडा आरटीओने डिसेंबर 2022 पर्यंत दंडाद्वारे 1.90 कोटी रुपये वसूल केल्याची माहिती दिलीय.

2022 मध्ये वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणी नुसार, अधिकाऱ्यांनी 2021 च्या तुलनेत 1.19.49.400 रुपये अधिक जमा केले. फोंडा आरटीओ पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2,076 वाहनचालकांना अतिवेगाने वाहन चालवल्याबद्दल वाहनचालकांना दंड करण्यात आला..

RTO
Siolim: जागरेश्वराचा जागोर मोठ्या उत्साहात; हिंदू-ख्रिस्ती समाजाच्या एकोप्याचे प्रतीक

हेल्मेट न घालता 139, परवान्याशिवाय वाहन चालवल्याबद्दल 7,193, धोकादायक पद्धतीने पार्किंग केल्याबद्दल 5.039, टिंटेड चष्मा लावल्याबद्दल 5.039, सीट-बेल्ट न लावल्याबद्दल 3,551, नो एन्ट्री एरियामध्ये प्रवेश केल्याबद्दल 4,380, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याबद्दल 479, वाहन चालवताना फोनवर बोलल्याबद्दल, दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल 143 आणि नंबर प्लेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल 1,008 जणांना दंड केला आहे

RTO
Mahadayi Water Dispute: पाणी वळवल्यास दुष्काळाची शक्यता; म्हादई प्रश्नावरुन सर्वपक्षीयांचा आक्रोश

"वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे दंडाच्या माध्यमातून महसूल वसुलीत मोठी वाढ झाली आहे. वाहतूक नियम सर्वांना समजावेत यासाठी आम्ही शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवतो. यावेळी विद्यार्थ्यांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो," असे सिनारी यांनी सांगीतले.  दरम्यान, सध्या फोंडा वाहतूक पोलिसांकडे फक्त दोन ऑपरेशनल अल्कोमीटर असल्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात बराच विलंब होतो, अशी अडचणही त्यांनी बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com