Mahadayi Water Dispute: पाणी वळवल्यास दुष्काळाची शक्यता; म्हादई प्रश्नावरुन सर्वपक्षीयांचा आक्रोश

विधानसभेत म्हादईप्रश्र्नी ठराव मंजूर करुन तो पंतप्रधान, गृहमंत्री तसेच संबंधीत जलस्रोत मंत्र्यांना तो ठराव पाठवावा, अशी सूचना दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी केली आहे.
 Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: जोपर्यंत सर्व आमदार एकत्रितपणे म्हादईप्रश्र्नी लढा देत नाहीत, तोपर्यंत केंद्र सरकारावर दबाव येणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व मंत्र्यांची व आमदारांची बैठक बोलावली आहे. हे चांगलेच झाले.

तरीसुद्धा विधानसभेत म्हादईप्रश्र्नी ठराव मंजूर करुन तो पंतप्रधान, गृहमंत्री तसेच संबंधीत जलस्रोत मंत्र्यांना तो ठराव पाठवावा, अशी सूचना दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सूचना केली.

तसेच, म्हादईचा उगम जरी कर्नाटकात होत असला, तरी नदीचा प्रवाह गोव्यातून वाहतो. त्यामुळे नदी वळवण्याचा कर्नाटकाला अधिकार नाही. नैसर्गिकरीत्या गोव्याला मिळणारा पाण्याचा हिस्सा मिळालाच पाहिजे.

 Mahadayi Water Dispute
Kalasa Project: मलप्रभेच्या काठावरील गावांना पुराचा धोका तीव्र - राजेंद्र केरकर

उद्या म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्यात दुष्काळ येईल, असा इशारा गोवा तृणमूल काँग्रेसचे प्रभारी कीर्ती आझाद यांनी दिला. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com