गोव्यात पोर्तुगिजांनी तोडलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या तपशीलांवर काम सुरू

पुरातत्त्व विभाग पोर्तुगीज वसाहती काळात नष्ट झालेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेशी संबंधित तपशीलांवर काम करत आहे: प्रमोद सावंत
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak

पणजी: पोर्तुगीजांनी कथितपणे उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचा मुद्दा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पुन्हा एकदा उपस्थित केला. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले की, पुरातत्त्व विभाग पोर्तुगीज वसाहती काळात नष्ट झालेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेशी संबंधित तपशीलांवर काम करत आहे. (reconstruction of temples demolished by Portuguese begins in goa)

Pramod Sawant
मी दिल्लीला गेलो होतो कारण...:दिगंबर कामत

मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने (State Government) अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. “गोव्यात अनेक ठिकाणी आपल्याला अनेक मंदिरे जीर्ण आणि दुर्लक्षित स्थितीत आढळतात. पोर्तुगीज राजवटीत ही सांस्कृतिक केंद्रे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पर्यटन विकासाचा विचार करून या मंदिरांची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारासाठी आम्ही 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे,' असे सावंत यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते.

Pramod Sawant
क्रीडा क्षेत्राची सूत्र हाती येताच गोविंद गावडेंची मोठी घोषणा

आजपर्यंतच्या इतिहासातील ही अर्थसंकल्पात (Budget) करण्यात आलेली पहिलीच तरतूद आहे. डिसेंबर 2021 मध्ये गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षानिमित्त गोव्यातील पुरातन आणि पोर्तुगिजांनी मोडतोड केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचं काम सरकारने हाती घेतल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले होते. यासाठी सरकारने अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद केली असून या धार्मिक स्थळांचा विकास लवकरच केला जाणार आहे. सरकारने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे गोवेकरांनीही कौतुक केले आहे. आपल्याला हिंदू संस्कृतीचे जतन करायचे असून यासाठी मंदिरांचे जतन होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com