मी दिल्लीला गेलो होतो कारण...:दिगंबर कामत

राष्ट्रीय वृत्तवाहिन्यानी कामत भाजपात जाणार असे वृत्त प्रसिद्ध केल्याने गोव्यात खळबळ माजली होती.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दिगंबर कामत भाजपात जाणार असून त्यासाठी भाजप श्रेष्टींना भेटण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत अशी गोव्यात अफवा पसरलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर कामत यांच्याशी संपर्क साधला असता, मी तर लग्न समारंभासाठी पत्नीसह दिल्लीला गेलो होतो असा खुलासा त्यांनी केला. (I went to Delhi to attend a wedding says Digambar Kamat)

Digambar Kamat
भाजप विकासासाठी की लुटण्यासाठी? अमरनाथ पणजीकरांचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय वृत्तवाहिन्यानी कामत भाजपात जाणार आणि भाजप त्यांना विजमंत्रीपद देणार असे वृत्त प्रसिद्ध केल्याने गोव्यात खळबळ माजली होती.

आज संध्याकाळी कामत पुन्हा गोव्यात आले असता त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी लग्न समारंभासाठीही कुठे जाऊ शकत नाही का ? मी कुठेही गेलो तरी येथे गोव्यात (Goa) अफवा उठतात. मला माझे खासगी आयुष्य नाही का ? असा सवाल त्यांनी केला. आपण काँग्रेस (Congress) मध्येच आहे आणि भाजपच्या (BJP) कुठल्याही पदाधिकाऱ्याला भेटलेलो नाही असे त्यांनी सांगितले.

Digambar Kamat
क्रीडा क्षेत्राची सूत्र हाती येताच गोविंद गावडेंची मोठी घोषणा

दोन दिवसांपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका गटापुढे बोलताना कामत यांनी आपल्याला डावलल्याची भावना व्यक्त केली होती. कामत यांनी आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांना नाराजीची कल्पना दिली आहे. ज्या पक्षात मान नाही त्या पक्षात तुम्ही राहू नका, असा सल्ला त्यांना कार्यकर्त्यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com