Ravindra Bhavan Madgaon
Ravindra Bhavan MadgaonDainik Gomantak

Margao : मडगाव रवींद्र भवन अध्यक्ष नियुक्ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे

हवामानांतील परिणामामुळे ए.सी बिघाड होवू शकतो : गोविंद गावडे
Published on

Margao : मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे रिक्त आहे. या पदावर अनेकांचा डोळा आहे; पण ती जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवावी, त्याबाबत सरकारचा निर्णय होत नाही, त्यामुळे सदर फाईल सध्या मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पडून आहे.

खरे तर अध्यक्षाविना रवींद्र भवनचे काही अडत नाही, कारण गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. पण या संकुलातील ‘ए.सी.’ परवा बंद पडला व त्यातून या रिक्त असलेल्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुढे आला.

Ravindra Bhavan Madgaon
Pernem News : कोले यांना गोवा पर्यटक टॅक्सी संघटनेचा पाठिंबा

परवा एका तियात्राचा खेळ सुरू असताना एसी बंद पडला व भयंकर उष्म्यामुळे प्रेक्षक भडकले. त्या नंतर काल रवीन्द्र भवनातच एका कार्यक्रमासाठी आलेल्या कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचे लक्ष पत्रकारांनी या ‘ए.सी.’ बंद पडण्याच्या प्रकाराकडे वेधले. त्यांतून या रिक्तपदाचा मुद्दा पुढे आला.

मंत्री गावडे म्हणाले, अध्यक्षपद तथा संपूर्ण मंडळ रिक्त असल्याने अधिकारी कोणतेच मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत. अध्यक्षपदाबाबत ते म्हणाले, की संबंधित फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे व त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

सहा महिन्यांपूर्वीच येथे नवीन ए.सी. बसविला होता. त्यात असा बिघाड का झाला, त्याची आपणास कल्पना नाही, कदाचित हवामानांतील भयंकर उष्म्याचा तो परिणाम असू शकतो, पण आपण त्या बाबत चौकशी करू, असेही गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com