Goa Politics: राजीनाम्याबद्दल प्रदेशाध्यक्षांशी बोलणे? छे! छे!! रवी नाईकांनी दिला अफवांना पूर्णविराम

Ravi Naik: प्रदेशाध्यक्ष दामू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि आपण द्यायला नकार दिला अशा प्रकारचे जे वृत्त काही माध्यमांतून प्रसिद्ध झाले ते विपर्यास करणारे आहे, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
Ravi Naik Latest News
Ravi Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि आपण द्यायला नकार दिला अशा प्रकारचे जे वृत्त काही माध्यमांतून (गोमन्तक नव्हे) प्रसिद्ध झाले ते वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. मंत्रिपद किंवा मंत्रिपदाचा राजीनामा याबाबतीत प्रदेशाध्यक्षांशी आपली काहीही बातचीत झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री होतो तसेच सध्याच्या मंत्रिमंडळात एक जेष्ठ मंत्री म्हणून कार्यरत आहे, त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक आपल्याला भेटायला आले होते असे ते म्हणाले. फोंडा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासंबंधी आमच्यात प्रामुख्याने बोलणी झाली.

Ravi Naik Latest News
Goa Politics: भंडारी समाज भाजपपासून दुरावतोय? डॅमेज कंट्रोलसाठी प्रदेशाध्यक्ष दामू - मंत्री रवी नाईक यांच्यात खलबते

दामू नाईक प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर व्यक्तिगत भेट झाली नव्हती याचा उल्लेख करून त्यामुळेच ते भेटायला आले, असेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याच सरकारातील मंत्र्यांला भेटणे यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला.

Ravi Naik Latest News
Goa Politics: 2027 च्या निवडणुकीत 52 टक्के मते मिळविणार, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत चाळीसही जागांवर लढणार; भाजपचा महत्त्वपूर्ण संकल्प

बात का बतंगड!

या भेटीचा उगाच काहींनी ‘बात का बतंगड’ केला आहे असे ते म्हणाले. एक मात्र खरे रवी - दामूंच्या काल फोंड्यात झालेल्या या भेटीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. पण रवींनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने अफवांचे खंडन करून सबकुछ ‘नॉर्मल’ असल्याचे दाखवून दिले आहे.

काहींनी (गोमन्तक नव्हे) मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तेही सपशेल चुकीचे आहे. माझा पक्ष बळकट करण्यास मी फिरू शकत नाही का? एखाद्या नेत्याला मी भेटलो तर त्याचे कारण मी सांगितलेच पाहिजे, असे नाही. प्रदेशाध्यक्षाने राज्यभर प्रवास करत राहिले पाहिजे. कार्यालयात बसून संघटना चालवता येत नाही. मी रोखठोक काय ते सांगतो. आता एक नंतर एक, असे मी करत नाही.

दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com