Goa Politics: 2027 च्या निवडणुकीत 52 टक्के मते मिळविणार, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत चाळीसही जागांवर लढणार; भाजपचा महत्त्वपूर्ण संकल्प

Goa BJP: २०२७ मध्ये २७ हून अधिक उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्यही कार्यकर्त्यांसमोर ठेवण्यात आले. जे जुने कार्यकर्ते नाराज असतील, त्यांनी राग न धरता पुन्हा संघटनेत सक्रिय व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलं.
Goa BJP
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते मिळवण्याचे भाजपचे ध्येय असून त्यासाठी सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत संपूर्ण चाळीसही जागा लढवू, असा संकल्प उत्तर गोवा भाजप सक्रिय संमेलनात करण्यात आला.

२०२७ मध्ये २७ हून अधिक उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्यही कार्यकर्त्यांसमोर ठेवण्यात आले. जे जुने कार्यकर्ते नाराज असतील, त्यांनी राग न धरता पुन्हा संघटनेत सक्रिय व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत केले.

यावेळी उपस्थित भाजप नेत्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी, बूथ स्तरावरील सक्रियता आणि जनसंपर्क मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपचे हे संमेलन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निर्धाराचा ठसा उमटवणारे ठरले. उत्तर गोवा भाजपतर्फे सक्रिय सदस्य संमेलनाचा भव्य कार्यक्रम मंगळवारी पणजीत पार पडला.

Goa BJP
Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, लोकसभा खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, भाजप आमदार व माजी आमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनाला ९६ टक्के सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सदस्य नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. देशभरात भाजपच्या १४ कोटी सदस्यांपैकी १० लाख सक्रिय सदस्य आहेत, तसेच गोव्यात ४ लाख २० हजार सदस्य असून ३,७०० कार्यकर्ते सक्रिय आहेत. यातील ९६ टक्के कार्यकर्ते आजच्या संमेलनाला उपस्थित होते, ही आमच्या संघटनात्मक बळाची साक्ष आहे, असे दामू नाईक म्हणाले.

Goa BJP
Goa Crime: नोकरी मिळत नसल्याने 24 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; सासष्टी येथील धक्कादायक प्रकार!

कार्यकर्ता हाच आधारस्तंभ : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संमेलनात भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीचा आराखडा मांडला. भाजप सलग तीनवेळा सत्तेत आहे, चौथ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे. मते पक्षाच्या चिन्हावर, पंतप्रधान मोदी, दिवंगत नेते मनोहर पर्रीकर, आमदारांच्या व्यक्तिमत्त्वामुळे मिळतात, पण शेवटी कार्यकर्त्यांमुळेच विजय निश्चित होतो. म्हणून कार्यकर्ता हा आमचा खरा आधारस्तंभ आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com