गोव्याच्या कोविड पॉझिटिव्ह रेटमध्ये झपाट्याने वाढ

गोव्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 दिवसात 9879 वर; राजकीय नेत्यांनी नियमावली टांगली खुंटीवर
Goa Corona Case
Goa Corona CaseDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात करोनाच्या प्रकरणात लक्षणीय वाढ होत आहेत, मागील गोव्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 दिवसात 9879 वर गेला असून, राज्यातील कोविड पॉझिटिव्ह रेट 24.76% इतका वाढला असून 7761 नमुन्यांपैकी 1922 नमुने कोविडसाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत. 261 पुनर्प्राप्तीसह सक्रिय कोविडची (COVID-19) संख्या 9209 आहे. तसेच गोव्यात आणखी एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. कोविडमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांची संख्या 3532 वर पोहोचली आहे. (Goa Corona Case) राज्याचा रिकव्हरी रेट 93.29 % इतका खाली आला आहे. (Rapid increase covid positive rate in goa)

Goa Corona Case
Goa: कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले!

गोव्यातील (Goa) करोनाचा आढावा

  1. कोविडमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण मृतांची संख्या 3532 वर पोहोचली आहे.

  2. आज नमुन्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह - 1922

  3. आज बरे झालेले रुग्ण -261

  4. गेल्या 24 तासांतील मृत्यू - 1

  5. एकूण मृतांची संख्या - 3532

  6. पुनर्प्राप्ती दर - 93.29 %

  7. रूग्णांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज - 4

  8. आज रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण - 5

  9. गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 9202

Goa Corona Case
...म्हणून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, लोबोंचं स्पष्टीकरण

राजकीय नेत्यांकडूनच (Political Leader) करोनाची नियमावली सरेआम पायदळी तुडवली जात आहे..

भाजप (BJP), गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांचे (Political Party) नेते भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. ECI ने दिलेल्या नियमावलीप्रमाणे केवळ पाच लोकांना घरोघरी प्रचारासाठी परवानगी आहे. परंतु, पेडणे व बारदेश तालुक्यातील शेकडो लोक त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक पक्षाच्या नेत्यांच्या घरोघरी जाऊन निवडणूक प्रचारात सहभागी होताना दिसले. रविवारी विविध राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी घरोघरी जाऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. त्यापैकी गोवा फॉरवर्ड पक्षाचे दीपक कलंगुटकर आहेत ज्यांनी पार्से येथून घरोघरी प्रचाराला सुरुवात केली, काँग्रेसचे केदार नाईक तसेच दयानंद मांद्रेकर यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com