Goa Rape Case: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रमाण देशात सर्वाधिक; दर 4 दिवसात एक बलात्कार

Goa Rape Case: बलात्काराच्या चार घटनांमागे तीन बलात्कार अल्पवयीनांवरील असल्याचे आकडेवारी सांगते. एनसीआरबीने 2022 ची गुन्हेगारीविषयीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.
Cuncolim Crime News
Cuncolim Crime NewsDainik Gomantak

Goa Rape Case: गोव्यात अल्पवयीनांवरील झालेल्या बलात्काराच्या घटनांची आकडेवारी ही देशातील सर्वाधिक असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्‍युरोने (एनसीआरबी) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Cuncolim Crime News
Goa Politics: दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करा; ‘त्या’ आठ आमदारांना सुप्रिम कोर्टाचा आदेश

बलात्काराच्या चार घटनांमागे तीन बलात्कार अल्पवयीनांवरील असल्याचे आकडेवारी सांगते. एनसीआरबीने 2022 ची गुन्हेगारीविषयीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.

गोव्यात 2022मध्ये 75 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 57 या पीडित 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुली होत्या. चिंताजनक बाब म्हणजे अल्पवयीन मुलींवरील बलात्कार हे 2022 मध्ये गोव्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण बलात्कारांपैकी 76 टक्के होते. गोव्यात एकूण 73 बलात्काराच्या घटना नोंदल्या झाल्या, ज्यामध्ये एकूण 75 बळी होते.

गोव्यात आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराच्या 57 अल्पवयीन पीडितांपैकी, सहा वर्षांखालील 1, 6 ते 12 वर्षांच्या दरम्यान 12, 12 ते 16 वर्षांच्या दरम्यान 26 आणि 16 ते 18 वर्षांच्या दरम्यान 17 अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे

75 पैकी 93.2 बलात्कार प्रकरणांमधील आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते. 75 पैकी 68 बलात्कार पीडितांनी सांगितले की, गुन्हेगार त्यांच्या ओळखीचे होते. खरे तर 9 आरोपी कुटुंबातील होते. 2022 मध्ये गोव्यात महिलांवर अत्याचाराच्या 90 घटना घडल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com