भोंदू घाडीबाबाच्या कोठडीत वाढ

संशयित पीडितेच्या आईची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
Person arrested
Person arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : अंधश्रद्धेच्या नावाने एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या कथित तांत्रिक भोंदू घाडीबाबाच्या कोठडीत वाढ झाली असून त्यास न्यायालयाने आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर संशयित आईला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

मुलीच्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी दैवी शक्तींना शरीरसुख देणे बंधनकारक असते असे सांगून 50 वर्षीय अविवाहित भोंदू घाडीबाबाने या पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या आईसमोरच लैंगिक अत्याचार केले होते.

ही घटना 30 मे रोजी घडली होती. या प्रकारानंतर पीडितेने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर वडिलांनी पोलिस तक्रार देताच, कोलवाळ पोलिसांनी या कथित भोंदू घाडीबाबा ऊर्फ रमाकांत नाईक याच्यासह या दृषकृत्यासाठी तितकीच जबाबदार असलेल्या पीडित मुलीच्या आईला अटक केली होती.

Person arrested
‘धर्माच्या नावाखाली भाजपचे राजकारण’

पीडितेची आई या भोंदू घाडीबाबाला मागील पंधरा वर्षांपासून पूजते. यापूर्वी ती कित्येकदा संशयित घाडीबाबाकडे आपल्या आयुष्यातील तक्रारी घेऊन त्याच्या घरी व शिरसई येथे घाडीबाबाच्या कथित निर्माणधीन मठात जात होती. संशयिताने या मठास आपल्या आईचे नाव दिले आहे.

संशयित रमाकांत नाईक बेलाविस्तवाडा येथे पाण्याच्या जलकुंभाजवळ एका झोपडीवजा घरात राहायचा. या झोपडीवजा घराचे आता एका मंदिरसदृश्य मठामध्ये रुपांतरणाचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com