Ranjit Savarkar : ‘हलाल जिहाद’ला हिंदूंनी आर्थिक सक्षम होऊन उत्तर द्यावे

रणजीत सावरकर : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’चे उद्‍घाटन
Ranjit Savarkar
Ranjit SavarkarGomantak Digital Team

Ponda : हिंदू संघटित नाहीत.पूर्वीची लढाई ही तलवारीच्या बळावर होती, तर आताची लढाई आर्थिक स्तरावर चालू आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदूंना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेल, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात् एकादश ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती सद्गुरू(डॉ.) चारुदत्त पिंगळे, सद्‍गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन, पू. संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी महाराज, पू. भागिरथी महाराज, भागवताचार्य (अधिवक्ता) राजीवकृष्णजी महाराज झा, महंत दीपक गोस्वामी उपस्थित होते.

Ranjit Savarkar
Ponda news : सभागृह उद्‌घाटनाला मुहूर्त मिळेना, कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली इमारत विनावापर

सावरकर पुढे म्हणाले की, संघटित नसणे हे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण असून नौखालीत ज्याप्रमाणे हिंदूंचे हत्याकांड झाले, तसेच आजही बांगलादेशातही हिंदूंचे शिरकाण होत आहे. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहे, असे डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. या अधिवेशनात 312 हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

Ranjit Savarkar
Ponda News : खांडेपार वीज कार्यालय रवींमुळेच!

दोन पुस्तकांचे मान्यवरांकडून प्रकाशन

यावेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड 1) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भागवताचार्य राजीव कृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पू. रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते, तर ठाणे (महाराष्ट्र) येथील दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड 1, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे दुर्गेश परुळकर, डॉ. चारुदत्त पिंगळे, केरळीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com