Goa : माशेल-कुंभारजुवेत रंगला सांगोडोत्सव (Sangodotsav)

Goa नदी किनारी रसिकांची गर्दी, ‘शिव मार्कंडेय...’ला प्रथम पारितोषिक
कुंभारजुवेतील  सांगोडोत्सव.
कुंभारजुवेतील सांगोडोत्सव.गोमन्तक
Published on
Updated on
कुंभारजुवेतील  सांगोडोत्सव. Goa
कुंभारजुवेतील सांगोडोत्सव. Goaगोमन्तक
कुंभारजुवेतील  सांगोडोत्सव. 
Goa
कुंभारजुवेतील सांगोडोत्सव. GoaGomantak

पणजी (खास प्रतिनिधी) ः गणपती विसर्जनाची अनोखी आणि जुनी पोर्तुगीजकालीन पध्दत म्हणजे कुंभारजुवे माशेल- सांगोडोत्सव (mashel) (Kumbharjuve) (Sangodotsav ) होय. आपली ही प्रथा कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे. वर्षानुवर्षे ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगडाची संख्या आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावे आता साकारले जावू लागले आहेत. यंदा झालेल्या सांगोडोत्सवाचा स्पर्धेत ‘शिव (shiv) आणि मार्कण्डेय सोबत यमराजाची हार’ या देखाव्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळाले. नदी किनारी सांगोडोत्सव पाहाण्यासाठी रसिकांची गर्दी होती. कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच. गणेश चतुर्थीचा सातवा दिवस हा माशेल - कुंभारजुवेचा सांगोडचा (नौकाविहाराचा) अविस्मरणीय दिवस असतो. यावेळी कोविडमुळे या उत्सवावर काहीसे परिणाम झाला असला तरी भक्तांमध्ये उत्सवाचे वातावरण होते.

कुंभारजुवेतील  सांगोडोत्सव.
Goa Sangodotsav: माशेल-कुंभारजुवेत उद्या सांगोडोत्सव


कुंभारजुवे गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणच्या गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे संपूर्ण गावच त्या उत्सवात सामील होतो. सांगोड उत्सवाची परंपरा पोर्तुगीज काळात सुरू झाली . श्री शांतादुर्गेचा केशरी रंगाचा गणपती सात दिवस देवस्थानात पुजून सातव्या दिवशी फटाक्‍यांच्या अतिशबाजीत मंदिरापासून तारीवाड्यापर्यंत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत पूर्वीपासून माशेलचे श्री. करंडे व श्री. सुखटणकर यांचे गणपती सहभागी होतात, अशी ही अनेक वर्षे चालू असलेली परंपरा आहे. अलीकडे शांतादुर्गेच्या "सांगोड''बरोबर कुंभारजुवे व माशेल तारीवाड्यावरील वेगवेगळे क्‍लब, सांस्कृतिक संस्था लहान सांगोड तयार करून त्यांच्यावर वेगवेगळे ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ सादर करतात .
यंदा झालेल्या सांगोडोत्सव स्पर्धेत टीम ४५ ने साकारलेल्या ‘शिव मार्कंडेय सोबत यमराजाची हार’ या देखाव्याला २० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. श्री सरस्वती उत्सव मंडळाने साकारलेला श्री राम लक्ष्मणाची पाताळातून सुटका या देखाव्याला १५ हजाराचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर पॅट्रीक ग्रुपचा गरुडाकडून अमृत पलायन या देखाव्याला १० हजार रुपयाचे तिसरे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. संत गोरा कुंभार, नुस्तेकार आणि चणेकार या तिन्ही पारंपारिक देखाव्यांना पारितोषिक देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ माजी राज्य निवडणूक आयुक्त नारायण नावती, समाजसेवक राजेश फळदेसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com