Anmod Ghat: रामनगर-अनमोड ब्रिजचे काम वाहतूक बंद न करता करावे; मालवाहतूकदारांची कळकळीची मागणी

Anmod Bridge Work: वाहतूक बंदमुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने येत्या दोन-चार दिवसांत पुन्हा पाहणी करून वाहतूक सुरू ठेवून काम करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल.
Anmod Ghat News
Anmod GhatDainik Gomantak
Published on
Updated on

रामनगर: रामनगर-अनमोड मार्गांवरील ७१ नंबर ब्रिज बनविण्यासाठी काम घेतलेल्या कंत्राटदाराने तीन महिन्यांचा बंद कालावधी हवा असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळवले आहे. मात्र हा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद केल्यास या रस्त्याचा वापर करणाऱ्या मालवाहतूकदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

त्यामुळे हा मार्ग बंद न करता पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोवा लोरी असोसिएशन, रामनगर टिप्पर असोसिएशन, खानापूर व बेळगाव ट्रक असोसिएशन व हुबळी ट्रक असोसिएशनने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे.

Anmod Ghat News
Anmod Ghat: दरड हटवली! दहा तासानंतर अनमोड घाट वाहतुकीस खुला

याबाबत प्रकल्प संचालक भोणेश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला हा रस्ता बंद करून काम करायचे नाही, परंतु वन विभागाच्या अडचणीमुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करून काम करण्याबाबत विचार करण्यात येत होता.

Anmod Ghat News
Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

परंतु वाहतूक बंदमुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने येत्या दोन-चार दिवसांत पुन्हा पाहणी करून वाहतूक सुरू ठेवून काम करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल. महामार्ग प्राधिकरण, कंत्राटदार व मालवाहतूकदार यांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com