Denmark Ambassador On Goa Visit: डेन्मार्कचे राजदूत गोवा दौऱ्यावर; तवडकरांनी केले स्वागत

सभापती, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा
Ramesh Tawadkar welcomed Freddy Svane, Ambassador of Denmark
Ramesh Tawadkar welcomed Freddy Svane, Ambassador of Denmark Dainik Gomantak
Published on
Updated on

Denmark Ambassador Freddy Svane On Goa Visit: डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन हे सभापती रमेश तवडकर यांच्या निमंत्रणानुसार शनिवारी गोव्यात दाखल झाले. सकाळी मोपा विमानतळावर सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन यांनी सर्वप्रथम जुने गोवे येथील प्रार्थनागृहाला भेट दिली. त्यानंतर दुपारी ३ वा. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याशी अन्य विषयांसह शिपिंग, दुग्ध, मच्छीपालन आदी व्यवसायासंबंधी चर्चा केली.

यावेळी संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही त्यांनी संध्याकाळी ४ वाजता भेट घेतली.

Ramesh Tawadkar welcomed Freddy Svane, Ambassador of Denmark
BCCI AGM Goa 2023: गोव्यात होणार BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा, वर्ल्डकपपूर्वी विविध निर्णयांची शक्यता

कृषी, दुग्ध, मच्छीपालन या क्षेत्रांत डेन्मार्क देशाने अनन्यसाधारण प्रगती केली आहे. त्यादृष्टीने या भेटीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ते काणकोणातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असतील. या ठिकाणी मतदारसंघातील सरपंच, पंच तसेच महिला मंडळांच्या पदाधिकारी आदी त्यांचे स्वागत करणार आहेत.

उद्या ‘श्रम-धाम’ला भेट

उद्या २४ रोजी संध्याकाळी श्रीस्थळ येथील वन खात्याच्या विश्रामगृहात श्रम-धाम संकल्पनेतून साकारलेल्या घरांचे सादरीकरण आणि प्रमुख ५० कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

त्यानंतर या संकल्पनेतून उभारलेल्या अर्धफोंड येथील हरिश्चंद्र नाईक, तारीर येथील प्रीती, आगोंद काराशीरमळ येथील विनंती वेळीप आणि धवळखाजन येथील सुजाता पागी यांच्या घरांना फ्रेडी स्वॅन भेट देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com