खरी कुजबुज: सभापतींचे मिशन जोरात!

Khari Kujbuj Political Satire: शेवटी दिवाळीलाही कृषिमंत्री रवी नाईक आणि त्यांचे पुत्र यांचे शुभेच्छा देणारे फलक सर्वप्रथम लागले आहेत. रविवारी पहाटे फोंडा शहरात तसेच इतर भागात लागलेले हे फलक लोकांच्या नजरेस पडले. चतुर्थीतही रवींनीच फलकांबाबत पहिला क्रमांक पटकावला होता.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

सभापतींचे मिशन जोरात!

जे करावे ते जबरदस्त करावे व भारी करावे या जिद्दीने काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर काम करतात. आपण उद्या राजकारणात असो वा नसो. राज्यात काही तरी नाव करण्यासारखे व जे कायम रहावे असे करावे म्हणून रमेश तवडकर संपूर्ण गोव्यात आपले मिशन घेऊन फिरतात. शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, डॉक्टर, वकील व विद्यार्थ्यांना भेटून आपले गैर राजकीय मिशन शेअर करतात.

मिशन रान भाज्यांना राज्य दर्जा, मिशन श्रमधाम व मिशन लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी ते झटत आहेत. आता हे करण्यासाठी ते आपल्या पदाचा उपयोग करतात म्हणून काही विरोधक आरोपही करतात. परवा सभापतींनी सचिवालयात प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आपले मिशन शेअर केले. प्राचार्यांना चांगले जेवणही दिले. आता जर चांगल्या कामासाठी सरकारी पदाचा वापर केला, तर विरोधकांच्या पोटात का दुखायला हवे असे रमेश समर्थक विचारायला लागले आहेत.

रवीच ‘बाजीगर’

शेवटी दिवाळीलाही कृषिमंत्री रवी नाईक आणि त्यांचे पुत्र यांचे शुभेच्छा देणारे फलक सर्वप्रथम लागले आहेत. रविवारी पहाटे फोंडा शहरात तसेच इतर भागात लागलेले हे फलक लोकांच्या नजरेस पडले. चतुर्थीतही रवींनीच फलकांबाबत पहिला क्रमांक पटकावला होता. दिवाळीलाही त्याचीच पुनरावृत्ती झाली.

फरक एवढाच की त्यावेळी फलकावर ‘कमळ’ चिन्ह नसल्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती, पण यावेळी हे चिन्ह फलकावर टाकण्याची त्यांनी खबरदारी घेतल्यामुळे विरोधकांना आणखी काही बोलायला वावच राहिलेला नाही. कोण फलक पहिल्यांदा लावतो याबद्दल लोकांत उत्सुकता होतीच. शेवटी रवीच परत एकदा ‘बाजीगर’ ठरले. आज दिवसभर शहरात याचीच चर्चा सुरू होती.

कुडचिरेवासीयांचा ‘एल्गार’

कुडचिरे गावात सध्या कचरा प्रकल्पाचा प्रश्न तापला आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे या गावात प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, कुडचिरेवासीयांना गावात कचरा प्रकल्प मुळीच नको आहे. गावात कचरा प्रकल्प उभा राहिल्यास गावच्या नैसर्गिक संपदेवर घाला बसून गावचे अस्तित्व नष्ट होणार अशी भीती लोकांना आहे. त्यासाठीच पूर्ण कुडचिरे गाव आता हातात हात घालून संघटित झाला आहे.

कोणत्याही स्थितीत गावात नियोजित प्रकल्प उभा राहू द्यायचा नाही. असा ठाम निर्धार कुडचिरेतील लोकांनी केला आहे. विकासाच्या बाबतीत काहीसे उपेक्षित असलेल्या कुडचिरे गावातील लोकांचा निर्धार पाहता लोकांनी सरकारलाच आव्हान दिले आहे. यामुळे आता सरकारची सत्त्वपरीक्षा ठरणार हे निश्चित आहे.

कारागृहातील कारवाया

पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई हे कारागृहाचे महानिरीक्षकही आहेत. पोलिसांना शिस्तीचे धडे देत वठणीवर आणणाऱ्या बिष्णोई यांनी कारागृहातील कैद्यांची दहशत मोडून काढण्यासाठी अनेक हातखंडे अवलंबिले. मात्र, त्यातून फारसा फायदा झालेला नाही. आयआरबी पोलिसांची पथके छाप्यासाठी अकस्मात घुसवून अनेकदा कारवाई केली आहे.

मोठ्या प्रमाणात मोबाईल व ड्रग्जही जप्त केले आहेत. मात्र, या वस्तू कारागृहात पोहोचणे कायमस्वरूपी बंद करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. कैद्यांना पोलिसी पद्धतीने वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु गुन्हेगारांना हे काही नवीन नाही. पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना या कारवाईतून जावेच लागते. या कारागृहात असलेले अधिकारीही या कैद्यांना फितूर असल्याचा संशय त्यांना आहे. मात्र, पुरावे सापडत नसल्याने ते हतबल झाले आहेत.

हल्लीच एका कैद्याने स्वतःहून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे कारागृहातील कारवायांचा अंदाज येतो. या महानिरीक्षकांच्या धडक कारवाईचा काही फरकच पडत नाही. त्यामुळे कारागृहात अनेक गुन्हेगारी कारवाया होत असल्या तरी सर्व काही आलबेल असल्याचे दाखवले जात आहे.

मेणबत्ती मोर्चा का झाला रद्द?

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत रायबंदर भागात करण्यात आलेल्या कामांमुळे तेथील नागरिकांनी मागील महिन्यात आंदोलन केले होते. ३० सप्टेंबरपर्यंत रस्ते करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर ज्यांनी रस्त्यावरून सरकारविरोधात आवाज काढला होता, त्या आमदार समर्थकांना जो आमदारांकडून प्रसाद मिळायचा तो मिळाल्याची चर्चा पणजीत सुरू झाली. त्याशिवाय या परिसरात मेणबत्ती मोर्चा काढण्याचेही ठरले होते.

मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती आमदारांपर्यंत कानोकान पोहोचली, त्यामुळे स्थानिक नगरसेवक हा आमदार गटाचा असल्याने मोर्चा कसा काय निघतो असाही सवाल उपस्थित झाल्यानेच तो मोर्चा काढला जाऊ नये म्हणून स्थानिक नगरसेवकाला मात्र परिसरातील लोकांची मनधरणी करण्यासाठी अनेकांच्या दारोदारी जावे लागल्याची चर्चा आहे. आता मोर्चाही निघणार नसल्याने येथील नागरिकांना आहे त्या समस्या सोसून घेण्याची एकप्रकारची तंबी मिळाली असावी असे दिसते.

सर्व काही सदस्य नोंदणीसाठी!

पणजीत भाजप सदस्य नोंदणी पणजी भाजप मंडळाने बरीच मनावर घेतली आहे असे दिसते. पणजीतील भाजप सदस्य संख्या दहा हजारांवर नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत असे आमदार समर्थक सांगतात. विधानसभेला भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली तरी अपेक्षेपेक्षा मताधिक्य मिळाल्याने आमदार बाबूश मोन्सेरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.

भाजपची एकगठ्ठा मते या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पडली हे काही लपून राहिलेले नाही. आता जी सदस्य नोंदणी झाली आहे, त्यातील फारफार तर दीड-दोन हजार मते कमी होतील, पण साधारण आठ हजारांपर्यंत तरी भाजपची मते पक्षाच्या उमेदवाराला मिळतील, असे गणित बाबूश यांनी मांडले असावे.

त्यामुळे भाजपचे पणजी मंडळ दुकाने, मार्केटमध्ये जाऊन सदस्य नोंदणी करीत आहे. यापूर्वी काही दिवसांत फुगलेली आकडेवारी पाहता अशीच ती फुगलेली दिसली तर त्यात नवल वाटायला नको.

बेकायदा बांधकामांची समस्या

बेकायदा बांधकामे ही गोव्यातील पूर्वापार समस्या आहे. पूर्वी गरज म्हणून लोक आपल्याच जमिनीत अशी बांधकामे करत व त्यामागील कारण संबंधित यंत्रणांकडून वेळीच परवाने न मिळणे हे असल्याचे सगळेच सांगतात व ते खरेही आहे. पण मुद्दा तो नाही, नंतरच्या काळात सरकारी व कोमुनिदाद जमिनीवर मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे उभी ठाकली व त्यांना राजकीय पाठबळ मिळाले.

मोतीडोंगरसारख्या भागात तर बहुतेक अशीच बांधकामे असल्याचा आरोप होतो. पण अजून त्यावर कारवाई झालेली नाही. कोणत्या एका पक्षाचा नव्हे, तर सत्तेवर आलेल्या प्रत्येकाकडून अशा बांधकामांची पाठराखण होते हा आजवरचा अनुभव असल्याचा ठपका अनेक संघटना ठेवत आहेत. सरकारी व सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांचेही असेच आहे.

नव्वदच्या दशकात उच्च न्यायालयाने पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत कठोर आदेश देऊनही संबंधित यंत्रणा शहाणी झालेली नाही. हेच उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांत दाखल करून घेतलेल्या स्वेच्छा याचिकेवर दाखवून दिल्याचे म्हटले जात आहे.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: लोबोंच्या दोरीउड्या...

विधानसभा निवडणुकीवर आपचा डोळा...

गत विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकून व नंतर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत विजय संपादन केल्यावर तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आम आदमी पक्षाचा आत्मविश्र्वास भलताच वाढलेला दिसतो. आता त्यांनी दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही जागा नव्हे, तर जास्तीत जास्त जागा जिंकून सरकार स्थापनेचे स्वप्न पाहण्यास सुरवात केली आहे.

बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांना तर भलताच आत्मविश्र्वास झालेला आहे. लोटली येथील निषेध सभेत तर आपल्या पक्षाचे सरकार आल्यास टीसीपी कायदे बदलले जातील असे सांगून जाहीरनाम्यातील एक कलम स्पष्टच केले. लोटली येथील निषेध सभा पक्षीय नसून गोव्याचे पर्यावरण व जमीन रक्षणकर्त्यांचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मात्र, या निषेध सभेत आपचे दोन्ही आमदार, प्रदेशाध्यक्ष व आपचे कार्यकर्तेच उपस्थित होते. मग ही सभा तर आम आदमी पक्षाचीच असून ती सर्वांची कशी असा प्रश्र्न लोक विचारू लागले आहेत. शिवाय बाणावली व वेळ्ळीनंतर आपचा डोळा कुडतरी मतदारसंघावर असल्याचेही बोलले जात आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com