Narendra Modi: रौप्यमहोत्सवी लोकोत्सवाला येणार 'पंतप्रधान मोदी'! तवडकरांनी दिली माहिती

Lokotsav 2024: लोकोत्‍सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. यंदाच्‍या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोकोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्‍‍वासन दिले आहे असे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले.
Narendra Modi, Ramesh Tawadkar
Narendra Modi, Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

PM Narendra Modi Attends Lokotsav 2025 Ramesh Tawadkar

आगोंद: लोकोत्‍सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. काल शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी पहिल्या सत्रात पेडणे येथील तुळशीदास गावस, प्रार्थना मोटे, डिचोली येथील दिलीप धारगळकर, साखळी येथील डॉ. नामदेव गावस, काणकोण येथील प्रतिमा प्रभुगावकर, विजय च्यारी, शिवोली येथील फ्रिलन्स, अर्जुन‌ हरमलकर, डॉ. अमर प्रभुदेसाई, डॉ. तेरेझा फेरेरा, शिवोली येथील उदय ताम्हणकर, दामोदर पारकर, गोवा राज्य मुख्य सचिव डॉ. व्ही. कँडवेलू यांचा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्‍यात आले.

दुसऱ्या सत्रात डिचोली येथील डॉ. राजेश केणी, कुंभारजुवा येथील कुमुद नाईक, नावेली येथील जयेश सिंगबाळ, उषा कवळेकर, वेळ्ळी येथील सुरेखा फळदेसाई, अशोक वेर्णेकर, गोपाळ चिंचणकर, प्रेमावती विर्डीकर, ज्योती कुंकळकर, राजदीप नाईक यांचा सत्कार करण्‍यात आला.

शनिवारी ७ डिसेंबर रोजी आश्‍विनी गावकर (सत्तरी), आनंद नाईक, पंढरीनाथ कर्पे (सांगे), प्रा. मनोज हळर्णकर, महेश नावेलकर (दाबोळी), ज्योती भगत, कपिल नाईक (सावर्डे), गुरुनाथ शंके, महेंद्र नाईक (फातोर्डा), विजय देसाई, विनायक नाईक यांचा सकाळच्या सत्रात सत्कार करण्यात आला.

Narendra Modi, Ramesh Tawadkar
Lokotsav 2024: 'तवडकर आदर्श राजकारणी आहेत', लोकोत्‍सव सोहळ्यात उरांव यांचे गौरवोद्‌गार

संध्याकाळच्या सत्रात श्रीकृष्ण धोंड (डिचोली), अभय जोग, दत्ताराम चिमुलकर (साखळी), संध्या होबळे, गिरीश उस्‍कैकर (सांताक्रुझ), रमाकांत अणवेकर, सावनी म्हांबरे (हळदोणा), डॉ. स्नेहा गावकर (केपे), अशोक नाईक, स्नेहल संझगिरी (कुठ्ठाळी), सुमंत आर. जोगळेकर, प्रशांत मंडेनेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Narendra Modi, Ramesh Tawadkar
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडली संकल्‍पना

यंदाच्‍या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोकोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्‍‍वासन दिले आहे. त्यांनाही लोकोत्सव, श्रमधाम संकल्पना आवडली आहे. सुमारे अर्धा तास त्यांनी या दोन्ही संकल्पनांसंदर्भात आस्थेने चर्चा केली. त्यावेळी त्यांनी २०२५ साली लोकोत्सवाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे सांगितले, असे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले. १९९२ पर्यंत गावडोंगरी-खोतीगाव येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला एकही युवा नव्हता. मीच त्यावेळी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेला एकमेव होतो. त्यामुळे येथील शिक्षणाबद्दलची निराशाजनक स्थिती जवळून पाहिली आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com