
Canacona Lokotsav 2024
काणकोण: सभापती डॉ. रमेश तवडकर हे अनुसूचित समाजातून व दुर्गम भागातून पुढे आलेले नेतृत्व आहे. अथक प्रयत्नांतून त्यांनी आदिवासी व अन्य समाज घटकांमध्ये विश्वास निर्माण केला. न्यूनगंड बाजूला ठेवून युवा वर्गाने पुढे यायला हवे ही शिकवण त्यांनी दिली. लोकोत्सव ही त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. आदर्श राजकारणी कसा असावा, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. तवडकर यांना आधुनिक काळातील भगवान बिर्सा मुंडा व एकलव्य असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार भाजपच्या आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर उरांव यांनी काढले.
काणकोण येथे आयोजित लोकोत्सवात उरांव बोलत होते. यावेळी भाजप आदिवासी मोर्चाचे कार्यकारी सदस्य आर. रामचंद्र नाईक, खजिनदार रवींद्र गावित, सरपंच सेजल गावकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, प्रियांका वेळीप, पूनम गावकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, आदर्श युवा संघाचे अशोक गावकर, सचिव गणेश गावकर आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
काणकोणसारख्या दुर्गम भागात साधनसुविधांचा अभाव असताना लोकोत्सवासारखा कार्यक्रम आयोजित करणे हे धाडसाचे काम आहे. मात्र आदिवासी समाजातून पुढे आलेले सभापती रमेश तवडकर यांनी अथक प्रयत्नांनी ते साध्य करून देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. लोकोत्सवाची सांगड समाजजीवन, संस्कृती व अर्थकारण यांच्याशी जुळवून येथील आदिवासी समाजाला त्यांनी नवी दिशा दिली. अन्य समाजाबरोबर आदिवासी समाजाला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला.
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारचेही त्यांना मोलाचे सहकार्य मिळत आहे. गोमंतकीयांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकही लोकोत्सवाचा आनंद लुटत आहेत, असे उरांव म्हणाले. सुविधा कोमरपंत यांनी सूत्रसंचालन केले. बलराम शिक्षण संस्थेचे सचिव जानू तवडकर यांनी आभार मानले.
आमोणे-काणकोण येथील हा लोकोत्सव म्हणजे साहित्यिक सर्जनोत्सवाबरोबरच ज्ञानसर्जनोत्सव आहे. आमच्यासारख्या शिक्षित व्यक्तींकडे आयुर्वेदिक व वनौषधींबद्दल ज्ञान नाही ते येथील आदिवासी वैद्यांकडे आहे, असे उद्गार सांगली येथील डॉ. दिलीप पटवर्धन यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना काढले.
यावेळी सभापती डॉ. रमेश तवडकर, सविता तवडकर, चित्रा क्षीरसागर, सांगली येथील मनोहर हिरेगर, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, साहित्य सर्जनोत्सवाचे संयोजक किसन फडते आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
काणकोण तालुक्याने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. मराठी-कोकणी वादामुळे दोन्ही भाषांचे नुकसान झाले. कोकणीला राजभाषेचा तर मराठीला सहभाषेचा दर्जा मिळाला. या क्षेत्रातही राजकारण शिरल्यामुळे भाषा व साहित्यावर वाईट परिणाम होत आहे, असे साहित्यिक परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कमलाकर म्हाळशी यांनी सांगितले.
मराठी व कोकणी साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त देविदास कदम, अमिता फळदेसाई, कवींद्र म्हाळशी यांनी साहित्यनिर्मितीबाबत आपापले पेपर सादर केले. चित्रा क्षीरसागर व अभिजीत पागी यांनी सूत्रसंचालन केले. किसन फडते यांनी परिसंवादात सहभागी मान्यवरांना स्मृतिचिन्हे प्रदान केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.