रामा यांच्या हल्ल्यामागे विद्यमान मंत्र्याचा हात? काँग्रेस आमदार फेरेरांचा संशय, 'गॉडफादर'चे नाव जाहीर करण्याचे पोलिसांना आवाहन

Rama Kankonkar Attack: करंझाळे येथे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे.
Rama Kankonkar Attack
Rama Kankonkar AttackDainik Gomantak
Published on
Updated on

करंझाळे येथे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विद्यमान मंत्र्यांचा हात या प्रकरणात असू शकतो, असा संशय हळदोण्याचे काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केला आहे.

हळदोण्याचे काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यामागे विद्यमान मंत्र्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील 'गॉडफादर' कोण आहे हे जाहीर करण्याचं आवाहन केलंय.

फेरेरा म्हणाले की, भाजप सरकार आणि भाजप पक्ष आम्हाला चांगल्याप्रकारे माहित आहे. पोलिसांना या प्रकरणाचा केवळ वरवरचा तपास न करता, योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Rama Kankonkar Attack
Goa Drug Case: उडता गोवा! राज्यात 10 दिवसांत 70 लाखांचा गांजा जप्त

या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड जेनिटो कार्दोज याला अटक करण्यात आली असून, त्याला सोमवारी मेरशी प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, २४ सप्टेंबर रोजी अन्य संशयितांसह पुन्हा न्यायालयात सादर करण्याचे आदेश आहेत.

Rama Kankonkar Attack
Goa Rain: ..परत पावसाचे टेन्शन! वेधशाळेने दिला 'यलो अलर्ट'; गोव्यात कोसळणार जोरदार सरी

रामा काणकोणकर यांच्‍यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी अटकेत असलेला कुख्‍यात गुंड जेनिटो कार्दोज याला केवळ दोन दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड पोलिस मिळवू शकले. सर्व संशयितांना आता २४ सप्‍टेंबरला एकाच वेळी न्‍यायालयात हजर करण्यासाठी त्याला दोन दिवसांची कोठडी दिली असली तरी राज्यभरात तो चर्चेला विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com