Panjim Protest: 'नेपाळी गोव्यात येऊन धंदा करतोय...', आंदोलकांनी Swiggyच्या 'डिलिव्हरी बॉय'ला घेरत सरकारवर साधला निशाणा

Rama Kankonkar Assault: करंझाळे येथे कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम उमटले आहेत.
Panjim Protest
Panjim ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: करंझाळे येथे कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम उमटले आहेत. या घटनेनंतर विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधी वातावरण अधिक तीव्र झाले आहे. रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. पोलिसांनी तातडीने पाच संशयितांना अटक केली आहे, परंतु राजकीय वादग्रस्त परिस्थिती अजूनही तापलेली आहे.

आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी एका 'नेपाळी' स्विगी डिलिव्हरी बॉयला घेरलं. आंदोलकांचा आरोप होता की, “गोवा सरकार काय करत आहे? नेपाळचा माणूस गोव्यात येऊन व्यवसाय करतोय आणि गाडीला गोव्याची नंबर प्लेट लावून काम करत आहे. राज्य सरकारकडून लोकांना स्विगी वापरायला सांगितल जातं, पण स्थानिकांचा हक्क कुठे राहतो? असा सवाल संतप्त आंदोलकांनी यावेळी केला.

Panjim Protest
Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

डिलिव्हरी बॉयशी संवाद साधल्यावर त्यानं स्पष्ट केलं की, तो गोव्यात १५ वर्षांपासून राहतो आणि व्यवसाय करत आहे. मात्र आंदोलकांचा राग पाहता, राज्यात व्यवसायाच्या अधिकारांवर व स्थानिक लोकांसोबत स्पर्धेवर चर्चा वाढली आहे.

Panjim Protest
Tigers In Goa: खाणींची अराजकता सुरू होण्यापूर्वी 'वाघ' देवराईत बसायचा, रक्षणकर्ता मानला जायचा; पाषाणी मूर्तीतला वाघ्रोदेव

राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात आंदोलनं सुरु आहे. करंझाळे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उभे राहिले आहेत. स्थानिक आणि बाहेरील व्यक्तींमधील व्यवसायातील संघर्ष, सुरक्षा प्रश्न आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa protests in last five years
Karapur One Goa Project Protest
Gen Z Movement India
Dabolim Airport Protest
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com