World Environment Day : पर्यावरणाप्रती सजग राहण्याची वेळ; चोडण एज्युकेशन सोसायटीतर्फे पर्यावरण दिन साजरा

राजू नायक : प्लास्टिकचा वापर थांबवा; जंगलतोड आणि ओझोन थर कमी झाल्यामुळे सध्या ग्लोबल वॉर्मिंग होत आहे.
World Environment Day
World Environment DayGomantak Digital Team
Published on
Updated on

World Environment Day : यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना प्लास्टिकचा वापर थांबवणे, ही आहे. कारण, प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि अनेक वर्षे ते तसेच राहत असल्याने पर्यावरण प्रदूषित करते. लोकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. आपण प्लास्टिक जाळणे टाळले पाहिजे; कारण ते कर्करोगजन्य वायू उत्सर्जित करते. जंगलतोड आणि ओझोन थर कमी झाल्यामुळे सध्या ग्लोबल वॉर्मिंग होत आहे.

पर्यावरणाप्रती आता सजग राहण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले. ‘गोमन्तक’ आणि चोडण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.५) ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहनही नायक यांनी यावेळी केले. मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह रोपटी लावली.

World Environment Day
Goa University : दहा वर्षे कामानंतर अचानक केले बडतर्फ

यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी लावण्यासाठी फळझाडांची रोपटी देण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, गोमन्तकचे वितरण विभागाचे साहाय्यक व्यवस्थापक भारत पोवार, आयटी व्यवस्थापक संजय हंद्राळे, दयानंद हायस्कूल चोडणच्या मुख्याध्यापिका ॲनी जेम्स, शाळेचे अध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे, मये मतदारसंघाचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, चोडणचे सरपंच पंढरी वेर्णेकर यांच्यासह शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

World Environment Day
Goa Session Court : वेळसाव रेल्वे दुहेरी मार्गाने पर्यावरण धोक्यात; खंडपीठाची केंद्रासह रेल विकास निगमला नोटीस

‘एनएसएस’ युनिट करणार देखरेख

शाळेच्या बागेत जी रोपटी आज लावण्यात आली. त्या रोपट्यांची देखभाल शाळेतील एनएसएस युनिट करणार आहे. मुख्य कार्यक्रमादरम्यान शाळकरी मुलांनी रोपट्यांच्या कुंड्यांमध्ये आपोआप हवे तितके पाणी शिंपण्याचा एक प्रयोग करून दाखवला. या प्रयोगात रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून रोपट्याला पुरेसे इतकेच पाणी घातले जाते.

World Environment Day
Goa Engineer Mega Recruitment: नोकर भरती नव्हे, विक्री! इंजिनिअर मेगा भरतीचा तिढा सुटेना; युवक काँग्रेस आक्रमक

पर्यावरणाचा ऱ्हास कमी करायचा असेल तर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करायला हवा. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे उपक्रम सोडून दिले पाहिजेत. माणसांनी लोभापोटी या पर्यावरणाची हानी केली आहे. मानवाच्या अविवेकी वागण्यामुळे निसर्गातील विविध घटकांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. कचरा टाकणे आणि प्लास्टिकचा अतिवापर करणे ताबडतोब थांबवायला हवे. त्यासाठी ‘गोमन्तक’ने चालविलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

प्रेमेंद्र शेट, आमदार, मये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com