‘सोनसोडो’ कचरा यार्डला आग शॉर्टसर्किटमुळे नाही असा राजीव सामंतांचा दावा

वीज खात्याचा दावा: दुर्घटनेनंतर तासाभराने वीजवाहिनी पडली तुटून
Huge fire in Sonsodo Garbage Yard
Huge fire in Sonsodo Garbage YardDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सोनसोडो कचरा यार्डाला लागलेली आग ही उच्चदाब वीजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा दावा अग्निशामक दलाने केला आहे. याच्‍या उलट ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली नाही तर आग लागल्याने तयार झालेल्या उष्णतेमुळे लाईन ट्रिप होऊन तार तुटून पडली असा दावा कार्यकारी अभियंते राजीव सामंत यांनी केला आहे.

Huge fire in Sonsodo Garbage Yard
गोव्यातही महाराष्ट्र पॅटर्न राबवणार! : संजय राऊत

वीज खात्याकडे जी नोंद आहे त्‍यानुसार सोनसोडो कचरा यार्डवरून जाणारी 33 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी दुपारी 1 वाजता ट्रिप झाली आहे आणि आग त्यापूर्वी तासभरापूर्वी लागली होती. याचाच अर्थ ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली नसून आगीच्या उष्णतेमुळे या वाहिनीचा कंडक्टर वितळून लाईन ट्रिप झाली असा आमचा अंदाज आहे असे सामंत म्हणाले. दरम्‍यान, ‘सोनसोडो’वरून जाणाऱ्या उच्चदाबाच्‍या वीजवाहिनीचा मार्ग बदला अशी मागणी आम्ही करूनही वीज खात्याने त्याकडे डोळेझाक केली हा मडगाव पालिकेचा आरोपही वीज खात्याने फेटाळून लावला आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 10 डिसेंबर 2019 रोजी आम्ही पालिकेला पत्र लिहून ही वाहिनी दुसरीकडे हलविण्याची आमची तयारी आहे असे कळविले होते. यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार असेही सांगितले होते. मात्र पालिकेने आजपर्यंत काहीच उत्तर दिलेले नाही असे सामंत यांनी सांगितले.

ही वीजवाहिनी 13 मीटर उंचीवरून जात असली तरी या भागात साठविलेल्या कचऱ्याच्या ढिगांची उंची 10 मीटरपर्यंत पोहोचली आहे. भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी या वाहिनीखालील कचऱ्याचा ढीग त्वरित बाजूला काढण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तात्पुरता उपाय म्हणून वीजवहिनीची उंची 13 मीटरवरून 18 मीटर करण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Huge fire in Sonsodo Garbage Yard
Goa Panchayat: पंचायत प्रभाग रचना कायद्यानुसार करा अशी आलेमाव यांची मागणी

50 लाखांची सामग्री झाली खाक

सोनसोडोवर लागलेल्या आगीत हजारावर कचराकुंड्या, वीज ट्रान्‍सफॉर्मर व अन्य उपकरणे मिळून सुमारे 50 लाख रुपयांची सामग्री खाक झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, बहुतांश यंत्रसामग्री जळाली असून जी नादुरुस्त झालेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी किमान दोन महिने लागणार आहेत. पालिकेने या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सल्लागार नियुक्त केला होता व त्यानेच हा अहवाल दिला आहे. या घटनेनंतर सोनसोडोवरील वीजपुरवठा बंद आहे. सुमारे हजारभर कचराकुंड्या ‘सूडा’कडून पालिकेला दारोदारी कचरा गोळा करण्‍यासाठी मिळाल्या होत्या. शिवाय अशाच मोठ्या संख्येतील कुंड्या जुन्या बाजारातील गोदामात पडून होत्या. पण लोकांनी तक्रारी केल्यानंतर त्या सोनसोडोवर नेऊन ठेवल्या होत्या.

कचरा बेलिंग मासळी बाजारात

शुक्रवारी भडकलेल्या आगीत सोनसोडो येथील बहुतेक व्यवस्था खाक झाल्याने मडगाव नगरपालिकेने तेथील बेलिंग प्रक्रिया आजपासून नगरपालिका इमारतीमागील जुन्या मासळी बाजारात सुरू केली आहे. आगीत बेलिंग यंत्रे व अन्य सामग्रीच नव्हे तर जनरेटर व वीज ट्रान्‍सफॉर्मरही खाक झाला आहे. पालिकेचे संबंधित अभियंता विशांत नाईक यांनी सांगितले की, आग दुर्घटनेनंतर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन महामंडळाशी संपर्क साधून मडगावातील सुक्या कचऱ्यावर वेर्णा येथे प्रक्रिया करावी असा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य झाल्यास पालिकेवरील ताण कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com