Electricity Issue: राजीव गांधी कला मंदिरात 'बत्ती गुल'! विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अचानक गेली लाईट

Kala Mandir Electricity Issue: फोंडा मतदारसंघातून दहावी आणि बारावीच्या गोवा बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजीव गांधी कला मंदिरात आयोजित करण्यात आला
Kala Mandir news
Kala Mandir newsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा मतदारसंघातून दहावी आणि बारावीच्या गोवा बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजीव गांधी कला मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर कार्यक्रमात अचानक वीज गेल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आणि आयोजकांचीही धावपळ उडाली.

प्रमुख पाहुण्यांच्या भाषणादरम्यान वीज गायब

हा कार्यक्रम उत्साहात सुरू होता. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नेतृत्व सल्लागार आणि प्रेरक वक्ते डॉ. जी. सुब्रमण्यम उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. मात्र, त्यांच्या भाषणाला सुरुवात होऊन काही मिनिटेच झाली असताना, अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे संपूर्ण सभागृहात अंधार पसरला. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ३० मिनिटांपेक्षा अधिक काळ वीज नव्हती, तरीही कोणतीही पर्यायी व्यवस्था कार्यान्वित झाली नाही.

आयोजकांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांची निराशा

अचानक वीज गेल्याने कार्यक्रमात तात्पुरता व्यत्यय आला आणि उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अर्धवट राहिल्याने, उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये थोडी नाराजी दिसून आली.

Kala Mandir news
Rajiv Gandhi Kala Mandir: महिला संगीत नाट्यस्पर्धेत बांदोड्यातील 'अहं देवयानी' नाटकाला प्रथम पुरस्‍कार

अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात बॅकअप वीज व्यवस्थेचा अभाव असल्याने आयोजनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे आयोजकांना तातडीने परिस्थिती हाताळावी लागली आणि वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत कार्यक्रम थांबवावा लागला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याच्या या क्षणात असा व्यत्यय आल्याने आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com