Rajiv Gandhi Kala Mandir: महिला संगीत नाट्यस्पर्धेत बांदोड्यातील 'अहं देवयानी' नाटकाला प्रथम पुरस्‍कार

Rajiv Gandhi Kala Mandir: महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘एकच प्याला‘ नाटकाला द्वितीय तर ‘संत तुकाराम' या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला.
Rajiv Gandhi Kala Mandir: महिला संगीत नाट्यस्पर्धेत बांदोड्यातील 'अहं देवयानी' नाटकाला प्रथम पुरस्‍कार
Published on
Updated on

Rajiv Gandhi Kala Mandir: फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिर आयोजित आठव्या किशोरी हळदणकर स्मृती महिला संगीत नाट्यस्पर्धेत बांदोडा येथील ओम कलासृष्टीच्‍या ‘अहं देवयानी’ या नाटकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. मांद्रे येथील अभिनव कला थिएटर्सच्या ‘एकच प्याला‘ नाटकाला द्वितीय तर मेरशी येथील धरणी कला सृष्टीच्या ‘संत तुकाराम' या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला.

स्‍पर्धेतील उत्तेजनार्थ पहिले बक्षीस कला शुक्लेंदू पणजीच्या ‘कुलवधू‘, दुसरे बाबा कोळगिरेश्‍वर सेल्फ हेल्प ग्रुप खरपाल-डिचोलीच्या ‘मत्स्यगंधा‘ तर तिसरे बक्षीस मडकईच्या देवताई कला क्रिएशन्सच्या ‘भक्त मार्कंडेय'' या नाटकाला मिळाले. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस शशिकांत नागेशकर (अहं देवयानी), द्वितीय प्रशांत मांद्रेकर (एकच प्याला), तृतीय तुषार बोरकर (संत तुकाराम) यांना प्राप्‍त झाले आहे.

उत्कृष्ट ध्वनिसंकलन : सागर गावस (मत्स्यगंधा), ओंकार नागेशकर (अहं देवयानी). उत्कृष्ट वेशभूषा : शिल्पा नागेशकर (अहं देवयानी), कल्पना देशपांडे (कुलवधू). उत्कृष्ट रंगभूषा : एकनाथ नाईक (अहं देवयानी), नीळकंठ खलप (मत्स्यगंधा). उत्कृष्ट संवादिनीवादक : प्रदीप शिलकर (अहं देवयानी), शिवानंद दाभोलकर (एकच प्याला). उत्कृष्ट तबलावादक : शैलेश शिरोडकर (मत्स्यगंधा), दत्तराज च्यारी (एकच प्याला) यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय बक्षीस मिळाले.

Rajiv Gandhi Kala Mandir: महिला संगीत नाट्यस्पर्धेत बांदोड्यातील 'अहं देवयानी' नाटकाला प्रथम पुरस्‍कार
ICAR Goa: शेतकऱ्यांनी'चणक'च्या 'पॉलिकल्चर' शेतीवर भर देण्याची गरज- त्रिवेश मयेकर

सोनाली आणि सलोनी अभिनयात प्रथम

उत्कृष्ट अभिनय स्त्री भूमिकेसाठी पहिले बक्षीस सोनाली नाईक (अहं देवयानी), दुसरे लक्ष्मी महात्मे सातार्डेकर (कुलवधू), तृतीय दीपश्री नाईक (संत तुकाराम) यांना तर उत्कृष्ट अभिनय पुरुष भूमिकेसाठी पहिले बक्षीस सलोनी नाईक (अहं देवयानी), दुसरे मृण्मयी मांद्रेकर (एकच प्याला) आणि तिसरे शीतल गायतोंडे (कुलवधू) यांनी पटकावले.

उत्कृष्ट नेपथ्य पहिले बक्षीस सूरजीत च्यारी (अहं देवयानी), दुसरे राजदत्त नाईक (मत्स्यगंधा) यांना मिळाले तर उत्कृष्ट प्रकाशयोजनेचे पहिले बक्षीस अश्‍वेश गिमोणकर (अहं देवयानी) व दुसरे बक्षीस विजय रेमजे (भक्त मार्कंडेय) यांना प्राप्‍त झाले.

श्रीजा, करिष्माचे उत्कृष्ट गायन

उत्कृष्ट गायन स्त्री भूमिकेसाठी प्रथम बक्षीस श्रीजा फडते (अहं देवयानी), द्वितीय श्रद्धा जोशी. उत्कृष्ट गायन पुरुष भूमिकेसाठी प्रथम करिश्‍मा नाईक मुळे (अहं देवयानी), द्वितीय कीर्ती काणकोणकर (संत तुकाराम).

उत्कृष्ट बालकलाकार अंतरा तुकाराम नाईक (मार्कंडेय). प्रशस्‍तिपत्र संस्कृती नाईक, वेधा मळेवाडकर, पल्लवी सुतार, भक्ती धुपकर, किमया नाईक, ज्योत्स्ना गावस, कल्पना देशपांडे, सृष्टी चोडणकर, करुणा च्यारी, श्रेया नाईक, कनक कोनाडकर, देवयानी नाईक, दीक्षिता परवार, करिश्‍मा च्यारी, सिद्धवी नाईक. स्पर्धेचे परीक्षण गौरी कामत, प्रचला आमोणकर व शिवनाथ नाईक यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com