'तुझ्या तोंडावर शेण टाकले, मारहाण केली, याचा बदला घ्यायला हवा'; 'रामा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेता राजदीपचे डोळे पाणावले Watch Video

Rajdeep emotional birthday wish: गोव्यातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राजदीप नाईक यांनी काणकोणकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडिओ तयार केला
rama kankonkar attack
rama kankonkar attackDainik Gomantak
Published on
Updated on

Rajdeep birthday wish to Rama Kankonkar: रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण सध्या गाजत असतानाच, गोव्यातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राजदीप नाईक यांनी काणकोणकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काणकोणकरांना शुभेच्छा देतानाच, या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर नाव न घेता जोरदार टीका केलीये. हे प्रकरण ताजे असतानाच राजदीप नाईक यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

'आम्ही निवडलेल्या नालायक लोकांमुळे...'

राजदीप नाईक यांचे 'हॅलो वासंती' हे व्हिडिओ बरेच लोकप्रिय आहेत, ज्यातून ते गोव्यातील प्रश्न मांडतात. मात्र यावेळी त्यांनी हा फोन वासंतीला नव्हे, तर थेट रामा काणकोणकर यांना लावला. या फोनवर बोलताना ते म्हणाले, "तू अजिबात घाबरू नकोस, कारण तुझ्या पाठीशी देव आहे."

यावर्षी केक कापून वाढदिवस साजरा करायचा होता, पण तू रुग्णालयात असल्यामुळे ते शक्य होणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुढे त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, "या नालायक लोकांना आम्हीच निवडून दिले, त्यामुळे तुझी विचारपूस करायचं धाडस होत नाही," असं म्हणत हल्लाप्रकरणासाठी राजकीय नेत्यांनाच एकार्थी जबाबदार धरले आहे.

'गोव्यासाठी तू हालअपेष्टा सोसल्यास'

राजदीप नाईक यांनी रामा काणकोणकर यांच्या नावाचा संबंध थेट प्रभू रामाशी जोडला. "जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अन्याय वाढला, तेव्हा रामाने जन्म घेतला, म्हणूनच तुझ्या आई-वडिलांनी तुझं नाव रामा ठेवले," असं ते म्हणाले. त्यांनी रामा काणकोणकर यांच्या दु:खाची तुलना १४ वर्षांच्या वनवासातून आलेल्या प्रभू रामचंद्रासोबत केली. तसेच, येशूने लोकांसाठी हातावर खिळे ठोकून घेतले, तसंच तू गोव्याच्या लोकांसाठी हालअपेष्टा सहन केल्यास, असंही ते म्हणाले.

rama kankonkar attack
Rama Kankonkar: काणकोणकर प्रकरणी नवे ट्विस्ट! हल्ल्यापूर्वी रामा यांचे काढले होते फोटो; तपासाची दिशा बदलण्याची शक्यता

"हे शेण तुझ्या तोंडात नाही, तर घाणेरडं राजकारण करणाऱ्यांच्या तोंडात आहे," असे म्हणत त्यांनी हल्लेखोरांच्या घाणेरड्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका केली. रामा काणकोणकर यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण गोवा त्यांच्या बाजूने उभा असल्याचेही ते म्हणालेत.

'रामा नाही, तर गोवा खचून जाईल'

नाईक यांनी रामा काणकोणकर यांच्या कुटुंबाचीही प्रशंसा केली. इतर अनेक पालक भीतीपोटी मुलांना मागे खेचतात, पण तुझ्या आई-वडिलांनी असं केलं नाही, . त्याचबरोबर, कठीण काळात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नीचेही त्यांनी कौतुक केलं.

शेवटी, "रामाला घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण त्याचा राखणदार त्याच्या पाठीशी उभा आहे," असे म्हणत त्यांनी रामा काणकोणकर यांना पुन्हा उठून उभं राहण्याचं आवाहन केलंय. कारण जर रामा खचला, तर गोवा देखील खचून जाईल, असं एक महत्त्वाचं आणि भावनिक विधान करत त्यांनी आपला संदेश पूर्ण केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com