Goa Temperature: कडाका वाढला! पणजीत सलग तीन दिवस पारा 20C च्या खाली

आठ वर्षांत प्रथमच 20C च्या खाली गेले तापमान
Goa temperature
Goa temperatureDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून  गोव्यातही थंड हवामान आहे.  या महिन्यात सुमारे एक आठवडा राज्यात दीर्घकाळ आल्हाददायक हवामान अनुभवले जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), पणजी यांनी शनिवारी सकाळी शहरासाठी किमान तापमान 18.6 सेल्सिअस नोंदवले. शुक्रवारच्या 18.7C च्या तुलनेत सामान्य तापमानापेक्षा 1.8 कमी नोंदवले गेले. एक आठवडाभर पारा 20C च्या खाली कायम आहे.

पणजीमध्ये मागील आठवड्याच्या सुरुवातीला पारा सामान्य पातळीच्या खाली गेल्यानंतर, आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवेतील गारवा अधिक तीव्र होऊ लागलाय. सोमवारी पणजी येथे किमान तापमान 17.2C नोंदवलेले गेले असून हे तापमान या वर्षातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे.

Goa temperature
Kalasa- Mahadayi River: ‘कळसा’मुळे म्हादईच्या उपनद्यांवर परिणाम

हवामानशास्त्रीयदृष्ट्या, गोव्यात जानेवारीत किमान तापमानाची नोंद केली जाते. हिवाळ्याच्या हंगामात उत्तरेकडील थंड वारे असल्याने किमान तापमान कमी होते. " IMD,चे राहुल. एम. म्हणाले, "या जानेवारी महिन्यात गेल्या चार ते पाच वर्षांतील सर्वात थंड ठरण्याची शक्यता आहे. अलिकडच्या वर्षांत, जानेवारीसाठी सर्वात कमी सरासरी किमान तापमान 2019 मध्ये 18.7C आणि 2017 मध्ये 18.8C नोंदवले गेले. 2018 मध्ये ते 19.9C पर्यंत वाढले, तर 2022 मध्ये सरासरी 20C, 2020 मध्ये 21.4C आणि 2021 मध्ये 23.7C होते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com