Mopa Airport: विकासाचं माहिती नाही मोपा विमानतळावरून शेतीत पावसाचं पाणी मात्र आलं; स्थानिक चिंताग्रस्त, रानटी जनावरांचीही भीती

Kasarvarne farms: मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्याचा विकास होईल, सर्वसामान्य न्याय मिळेल, अशी मोठी पेडणेवासियांनी अपेक्षा ठेवली होती.
Mopa Airport Water Kasarvarne farms
Mopa Airport Water Kasarvarne farmsDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्याचा विकास होईल, सर्वसामान्य न्याय मिळेल, अशी मोठी पेडणेवासियांनी अपेक्षा ठेवली होती. परंतु या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दर दिवशी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी मोपा विमानतळावरून थेट कासारवर्णेतील शेतीत घुसत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.

येथील ओहळाची रुंदी दरी प्रमाणे होऊन बाजूला असलेली झाडे पडत आहेत. त्याच प्रमाणे पाळीव, रानटी जनावरांसह शेतकऱ्यांनाही ओहळ ओलांडून जाणे शक्य होत नसल्याने काही दिवसात येथील पारंपरिक रानावनात येण्या-जाणाऱ्या वाट बंद होऊन रानटी जनावरे गावागावांत फिरू लागतील, अशी भीती शेतकरी उदय महाले यांनी व्यक्त केली.

पावसामुळे काणकोणात जनजीवन विस्कळीत

काणकोणात गेल्या दोन दिवसांप्रमाणे २५ रोजी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आज काणकोण अग्निशमन दलातर्फे रु.१ लाख ५० हजार रुपयांहून जास्त मालमत्तेचे रक्षण करण्यात आले.

Mopa Airport Water Kasarvarne farms
Pre Monsoon Rain: रेकॉर्डब्रेक 'मान्सूनपूर्व'! 983 टक्क्यांहून अधिक पाऊस बरसला; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

कोरगाव येथील झाड हटविले

पेठेचावाडा - कोरगाव येथे आनंद गाड घराजवळील वाहतुकीस व लोकांच्या जिवाला धोकादायक असलेले झाड पंच उमेश च्यारी यांनी स्वखर्चाने हटविले.

Mopa Airport Water Kasarvarne farms
Goa Rain: पणजीवर 800 कोटी खर्च केले, इतर शहरांकडेही लक्ष दिले असते तर पावसात इतकी दैना झाली असती का?

सासष्टीत झाडांची मोठी पडझड

सासष्टीत पावसामुळे झाडांच्या पडझडीच्या घटना घडल्या. रस्त्यांवर तसेच घरांवर झाडे पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. सुदैवाने मोठी हानी टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com