कोलमरड नावेली येथे मलनिस्सारण वाहिनीचे पाणी रस्त्यावर!

सदोष वाहिनीमुळे प्रत्येक वर्षी पावसात लोकांना पाहावे लागतात सांडपाण्याचे कारंजे
नावेली : रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून वाट काढत जात असलेली वाहने
नावेली : रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून वाट काढत जात असलेली वाहनेDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: तीन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने कोलमरड नावेली या भागातील मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर पाण्याने भरून गेल्याने आतील घाणेरडे सांडपाणी रस्त्यावरून वाहून जाऊ लागले असून मुख्य हमरस्त्यासह एकूण तीन ठिकाणी या घाण पाण्याचे कारंजे उडू लागले आहेत.

(Dirty water from the drainage canal at Margao)

नावेली : रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून वाट काढत जात असलेली वाहने
राज्यात रेड अलर्ट जारी; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

मुख्य रस्त्यावर गोमती बिल्डिंगजवळ एका ठिकाणी हे पाणी रस्त्यावरून वाहू लागले असून ईएसआय इस्पितळाच्या मागे दोन ठिकाणी असे पाणी रस्त्यावर वाहू लागले असून स्थानिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. सध्या येथे राहणाऱ्या लोकांच्या नशिबी नाक मुठीत धरून राहण्याची पाळी आली आहे. मलनिस्सारण विभागाच्या सहाय्यक अभियंत्या रोझी बोर्जीस यांनी आज येऊन परिस्थिती पाहिली पाऊस कमी झाल्यावर या चेंबरची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले.

माडगावचे माजी नगराध्यक्ष आणि नावेली येथील रहिवासी सावियो कुटीन्हो यांनी या वाहिनीचे काम सदोष असल्याने प्रत्येक पावसाळ्यात येथील लोकांना हा त्रास सहन करावा लागतो अशी माहिती दिली.

नावेली : रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून वाट काढत जात असलेली वाहने
डिजिटल ऑनलाईन व्यवहारात सतर्कता आवश्‍यक : अरुणकुमार पिल्लई

जैका उपक्रमाखाली पूर्ण केलेल्या या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून हे काम सदोष असल्याची माहिती असतानाही ही वाहिनी कार्यान्वित करून सरकारने लोकांच्या नशिबी हे घाण पाण्याचे भोग लिहिले आहेत असा आरोप केला.

या वाहिनीचे मेनहॉलमध्ये पाणी झिरपत असून त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी भरून ते वर वाहू लागते. नावेलीचा हा भाग दाट लोकवस्तीचा या भागात अनेक रहिवासी इमारती आहेत. सध्या अवघ्याच इमारती या वाहिनीला जोडल्या आहेत ज्यावेळी सर्व इमारती या वाहिनीला जोडण्यात येईल त्यावेळी वर्षाचे बाराही महिने हे सांडपाणी भरून रस्त्यावरून वाहू लागणार असा इशारा व्यवसायाने अभियंते असलेल्या कुटीन्हो यांनी दिला. ही मलनिस्सारण वाहिनी पुर्णपणे बदलण्याची गरज व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com