Khandepar Goa house collapse
Khandepar Goa house collapseDainik Gomantak

Khandepar: देवाक काळजी रे! पावसात कोसळले मातीचे घर, खांडेपार येथील गरीब कुटुंबावर संकट; मदतीला उभे राहिले हात

Khandepar House Collapse: गावठाण- खांडेपार येथील कमलाकांत गावडे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. त्यामुळे गावडे कुटुंब बेघर झाले असून सध्या एका तात्पुरत्या झोपडीत आसरा घेतला आहे.
Published on

फोंडा: गावठाण- खांडेपार येथील कमलाकांत गावडे यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळले. त्यामुळे गावडे कुटुंब बेघर झाले असून सध्या एका तात्पुरत्या झोपडीत आसरा घेतला आहे. दरम्यान, प्रोग्रेसिव्ह फोंडाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत कुर्टी-खांडेपारचे पंच अभिजित गावडे यांच्या सहकार्याने कोसळल्या घरातील साहित्य गोळा करून परिसर साफ केला.

गावडे यांचे आरोग्य त्यांना साथ देत नसल्यामुळे ते सध्या कोणत्या ही प्रकारचे काम करू शकत नाहीत. पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालते. त्यामुळे नवा निवारा उभारणे त्यांच्या आटोक्याबाहेर आहे.

गेल्या पावसात घराची एक भिंत कोसळली होती, परंतु त्याची डागडुजी करणे शक्य न झाल्याने या पावसात घराचा उर्वरित भाग कोसळला. वेळीच सरकारने मदतीचा हात दिला असता तर आज या कुटुंबावर ही स्थिती ओढवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Khandepar Goa house collapse
Goa Rain: गोव्यात मान्सूनचा जोर वाढणार! IMD कडून 28 जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

या भागात जुनी मातीची अनेक घरे असून पावसाळ्यात ती कोसळण्याची भीती आहे. यामुळे पंचायत तसेच राज्य सरकारने अशा घरांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Khandepar Goa house collapse
Goa Rain: दांडोसवाडा-मांद्रेतील रस्ता पावसामुळे जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत!

पक्का निवारा बांधून देणार : दळवी

प्रोग्रेसिव्ह फोंडा व दळवी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गावडे यांना लवकरच पक्का निवारा बांधून देण्यात येईल. कमलाकांत गावडे हे आजारपणामुळे आपल्याकरता नवा निवारा उभारू शकत नाहीत. अशावेळी एक सामाजिक संस्था म्हणून प्रोग्रेसिव्ह फोंडा आपले दायित्व निभावेल, असे विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com