फोंडा भागात वजनमाप खात्याची थेट कारवाई

तेवीस दुकानांवर छापे; 80 हजारांचा माल जप्त
Weight measurement department ponda
Weight measurement department pondaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंड्यातील वजन माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील विविध ठिकाणी जाऊन छापे टाकण्याचे सत्र सुरू केले असून सुरवातीला तिस्क - उसगाव व काल म्हार्दोळ, कुंकळ्ये, फर्मागुडी, बांदोडा, शिरोडा आदी भागात 23 दुकाने व आस्थापनांची तपासणी केली. (Raids on 23 shops Weight measurement department action in Ponda area)

Weight measurement department ponda
CM प्रमोद सावंत यांचे विदेश मंत्रालयाकडे मदतीचे आवाहन...

विविध ठिकाणच्या छाप्यात सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीचा अवैधरीतीने विकला जाणारा माल ताब्यात घेण्यात आला.त्यात कडधान्य तसेच इतर साहित्याबरोबरच वजन काट्यांचाही समावेश आहे.

फोंडा (Ponda) वजन माप खात्याचे अधिकारी शुबर्ट डीकॉस्टा तसेच देमू मापारी, विकास कांदोळकर या अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांसह हे छापे टाकले. 13 दुकानदारांकडे खात्याचा परवाना नसल्याचे आढळले. 4 कडधान्य दुकानांत वजन योग्य नसल्याचे आढळून आले. ही कारवाई वजनमाप अधिकारी अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com