Margaon: दक्षिण गोव्यात भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला; भीक मागण्यासाठी मुलांचा वापर, चालू वर्षात 41 जणांवर कारवाई

South Goa Begging Issue: दक्षिण गोव्यात भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला असून, पोलिसांनी चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ४१ भिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
Margaon
MargaonDainik Goamantak
Published on
Updated on

मडगाव : दक्षिण गोव्यात भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला असून, पोलिसांनी चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलपर्यंत ४१ भिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.

मागील वर्षी दक्षिण गोव्यात एकूण २०१ भिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. भीक मागणे, हा कायद्याने गुन्हा आहे. शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. खासकरून मडगाव, वास्को, फोंडा तसेच किनारपट्टी भागात भिकारी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे सर्व भिकारी परप्रांतीय असतात. पर्यटक तसेच स्थानिक रहिवाशांना ते त्रास देतात.

Margaon
Goa Crime: दारूच्या नशेत उडाले खटके; रायमध्ये ओडिसाच्या कामगाराची डोक्यात वार करून हत्या

मडगावचे पालिका उद्यान तर भीक मागणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. उघड्यावरच ते प्रातर्विधी उरकून घेतात. यापूर्वी त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेनेचे राजू विर्डीकर यांनी एका लेखी तक्रारीद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती. नंतर मडगाव पोलिसांनी या भिकाऱ्यांवर कारवाई केली होती; परंतु आता पुन्हा दक्षिण गोवा जिल्ह्यात भिकाऱ्यांची संख्या वाढल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

भीक मागण्यासाठी मुलांचा वापर

शहरात ट्राफिक सिग्नलवर भीक मागणाऱ्यांनीही चांगलेच बस्तान ठोकले आहे. लहान मुलांना भीक मागण्याच्या कामात जुंपले जाते. नंतर ती रक्कम टोळीचे सूत्रधार आपल्याकडे ठेवून त्या मुलांच्या हाती चिरीमिरी ठेवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संघटित टोळीच यात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. रेल्वे मार्गे हे भिकारी गोव्यात येतात, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

Margaon
Goa Crime: दारूच्या नशेत उडाले खटके; रायमध्ये ओडिसाच्या कामगाराची डोक्यात वार करून हत्या

मृत्युनंतरही परवड

दक्षिण गोव्यातील अनेक मोठ्या शहरांत भिकारी तसेच कचरा गोळा करणारे लोक उघड्यावरच राहतात आणि तेथेच प्रातर्विधी आटोपतात. त्यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. बऱ्याचदा आजारी भिकारी किंवा कचरा गोळा करणारे रस्त्याकडेलाच मृतावस्थेत आढळतात. त्यांचे नातेवाईक नसल्याने प्रशासनालाच त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागते. त्यामुळे मृत्युनंतरही त्यांची परवड होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com