Rahul Gandhi : ...म्हणून राहूल गांधी दिल्लीतून गोव्यात आले आणि घरी घेऊन गेले खास पाहुणे, वाचा सविस्तर

राहुल गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह काही महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केली
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi Visit Goa : लोकसभा निवडणुकांना अद्यापही वेळ असली तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेत्यांचे दिल्ली दौरे वाढले असून मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तर दुसरीकडे राज्याच्या खासगी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह काही महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केली.

यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती, लोकसभेसाठीची रणनीती, आठ आमदारांचे पक्षांतर याशिवाय पक्षांच्या अंतर्गत बाबींवर चर्चा झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज दिली.

Rahul Gandhi
Goencho Taxi Patrao Scheme : ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेअंतर्गत 100 लाभार्थ्यांना 'सीएनजी टॅक्सी'

‘जॅक रसल’ श्वानाच्या शोधात

दरम्यान, या दौऱ्यावेळी राहुल गांधी म्हापसा येथून दोन श्वानाची पिल्ले घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनी जॅक रसल टेरियर नामक प्रजातीच्या श्वानाची दोन पिले स्टेनली ब्रागांझा यांच्याकडून विकत घेतली. म्हापशातील स्टेनली ब्रागांझा यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या पत्नी व मुलांसोबत हितगुज केले.

राहुल गांधी हे ‘श्वान शौकीन’ आहेत. त्यासाठी त्यांना चांगल्या ब्रीडच्या ‘जॅक रसल’ श्वानाची गरज होती. हे श्वाना अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्याशिवाय हे फॅमिली श्वान असल्याने आनंदी, उत्साही, अत्यंत हुशार व रॉयल असतात.

साधारणपणे 30 ते 50 हजार रुपयांपर्यंत एक श्वान मिळतो. राहुल गांधी म्हापसा येथून दोन श्वानाची पिल्ले घेऊन दिल्लीला रवाना झाले. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

Rahul Gandhi take Puppies From Goa
Rahul Gandhi take Puppies From Goa
Rahul Gandhi
Bondla Wildlife Sanctuary : बोंडला’ला उतरती कळा; वनमंत्र्यांची माहिती

लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभर विरोधकांना एकत्रित करत ‘इंडिया’ या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीचे काम पुढे नेण्यासाठी राहुल गांधी यांनी देशभरातील महत्त्वाचे नेते आणि व्यक्तींच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

अर्थात या गाठीभेटी पूर्णतः खासगी स्वरूपाच्या आहेत. अशीच भेट आज गांधी यांनी म्हापसा येथे घेतली. यासाठी ते काल (बुधवारी) राज्यात दाखल झाले होते. दरम्यान, आज त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन विविध विषयांवर दीर्घ चर्चा केली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.

"या भेटीत राजकीय चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभेसाठीची रणनीती काय असावी? याचीही माहिती आणि सूचना दिल्या. याशिवाय पक्षातून गेलेल्या आठ आमदारांचीही गांधी यांनी विचारणा केली. आणि याविषयावरही चर्चा केली."

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com