गोव्यात आढळणारे 'जॅक रसेल टेरियर'; राहुल गांधी घेऊन गेलेली श्वान एवढी खास का आहेत?

देशात ‘जॅक रसेल टेरियर’ ही प्रजात गोव्‍यातच सापडते.
Rahul Gandhi Goa Visit
Rahul Gandhi Goa Visit
Published on
Updated on

Rahul Gandhi Goa Visit: श्वानांच्या प्रेमापोटी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी हे चक्क दिल्लीहून आकय-म्हापसा येथे पोहोचले. सामाजिक कार्यकर्ते तथा ‘अ‍ॅनिमल किंगडम’ या पेट शॉपचे सर्वेसर्वा स्टॅनली ब्रागांझा यांच्याकडून राहुल गांधी यांनी ‘जॅक रसेल टेरियर’ (Jack Russell Terrier puppies) नामक प्रजातीच्या कुत्र्याची ही दोन पिल्ले विकत घेत आपल्यासोबत नेली.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या कार्यालयाने स्टॅनली यांच्याशी संपर्क साधून ‘जॅक रसेल टेरियर’ या प्रजातीच्या कुत्र्यांबाबत चौकशी केली. राहुल गांधींनी या प्रजातीची दोन पिल्ले आपल्‍यासोबत नेली. देशात ‘जॅक रसेल टेरियर’ ही प्रजात गोव्‍यातच सापडते. 

का खास आहेत जॅक रसेल टेरियर?

जॅक रसेल टेरियर ही इंग्लंडमधील श्वानांची एक जात आहे. कोल्ह्यांची शिकार करण्यासाठी तयार केले होते. जॅक रसेल टेरियर ही कुत्र्यांची एक खास जात आहे, ज्यांना नजर आणि वास याची उत्तम क्षमता चांगली असते. ही कुत्री अतिशय बुद्धिमान असतात.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी पदक प्रदान केलेली हीच श्वानांची प्रजाती होती. झेलेन्स्कीने रशियन सैन्याने घातलेल्या भूसुरुंगांना बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या औपचारिक समारंभात जॅक रसेल टेरियर श्वानांना पुरस्कार दिला.

Rahul Gandhi Goa Visit
ED Takes Over Probe Into Salgaocars: चार हजार कोटींचे कथित विदेशी चलन उल्लंघन; गोव्यातील साळगावकर कुटुंबाची चौकशी आता ED करणार

राहुल गांधी हे ‘जॅक रसेल टेरियर’ प्रजातीच्या शोधार्थ होते आणि या श्‍‍वानाची पिल्ले त्‍यांना माझ्‍याकडे मिळाली. हा माझ्‍यासाठी अविस्मरणीय क्षण होता. बॉलिवूड स्टार जसे की करण जोहर, करिना कपूर तसेच काही उद्योजकांनीही यापूर्वी माझ्‍याकडून विविध श्‍‍वानांच्‍या प्रजातीची पिल्ले नेली आहेत. असे स्टॅनली ब्रागांझा यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com