सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपाल पदावरुन हकालपट्टी का केली? राहुल गांधींसमोर त्यांनीच केला खुलासा

मी लिहून देतो की मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - सत्यपाल मलिक
Rahul Gandhi And Satyapal Malik Interview
Rahul Gandhi And Satyapal Malik Interview
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi And Satyapal Malik Interview: गोवा, जम्मू-काश्मीर, मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा, शेतकरी आंदोलन याबाबत केलेल्या धक्कादायक खुलास्यानंतर देशातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या.

दरम्यान, अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्दांवर भाष्य करत, पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारवर गंभीर स्वरुपात टीका केली.

राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्यासोबत साधलेला संवाद यु-ट्युबवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राहुल गांधींनी मलिक यांनी विविध मुद्यांवर बोलतं करताना त्यांची राज्यपाल पदावरुन झालेली हकालपट्टीबाबत प्रश्न विचारला.

गोव्यात सुरु असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून भाजप सरकारने त्यांची बदली मेघालयात केली असे मलिक यावेळी म्हणाले.

तुम्ही ईशान्य भारतात देखील कार्यरत होतात? असा प्रश्न राहुल गांधी यांनी मलिक यांना विचारला.

'हो, पण ती नियुक्ती मला शिक्षा म्हणून दिली होती. गोव्यात मी भ्रष्टाचारावर मी खूप भाष्य केले त्यानंतर ती बदली करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्याची करतात तशी त्यांनी माझी पाचवेळी बदली केली. ईशान्य भारतात पाच जिल्हे आहेत, गोव्यात केवळ दोनच जिल्हे होते. मेघालय शांत राज्य आहे,' असे सत्यपाल मलिक म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी 28 मिनिटांचे संभाषण केले. यात पुलवामा, शेतकरी आंदोलन, एमएसपी, जातिगणना, मणिपूरमधील हिंसाचार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मलिक यांनी मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत असाही दावा केला.

निवडणुकीसाठी फक्त सहा महिने उरले आहेत. मी लिहून देतो की मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Gyanesh Kumar Resignation Demand
Rahul Gandhi FIR Protest Goa
Rahul Gandhi Pune Speech
Rahul Gandhi targets Amit Shah
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com