Quepem Municipality: नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी खास बैठक ४ जुलै रोजी

New Mayor: सदर पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे
New Mayor: सदर पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे
Quepem MunicipalityDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे पालिकेच्या नवीन नगराध्यक्ष निवड करण्यासाठी ४ जुलै रोजी खास बैठक बोलावण्यात आली आहे. सुचिता शिरवईकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.

नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केपे पालिकेवर केपेचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे वर्चस्व असून सदर पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे.

New Mayor: सदर पालिकेत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे
Quepem News : उगेत जिलेटिनचे तब्बल ५० खोके; पोलिसांची दिशाभूल

कवळेकर यांच्या गटात फक्त दोन महिला असल्याने दोघींनाही समान कार्यकाळ अलिखित काराराद्वारे वाटण्यात आला होता.

पालिकेत १३ सदस्य असून कवळेकरांकडे ९ तर केपेचे आमदार डिकॉस्टा यांच्याकडे ४ नगरसेवकांचे बळ आहे. दीपाली नाईक या बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Dhyan Foundation Goa Case
DA Hike Latest Update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com