Quepem: घातपात की आत्महत्या? केपे येथील कालव्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू

Quepem Canal Dead Body Found: केपे येथील डॉन बॉस्को परिसराजवळ असलेल्या एका कालव्यात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला.
Quepem Canal Dead Body Found
Quepem Canal Dead Body FoundDainik Gomantak
Published on
Updated on

केपे येथील डॉन बॉस्को परिसराजवळ असलेल्या एका कालव्यात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची माहिती मिळताच कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून हा मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढला.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो केपे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. मृतदेहाची अवस्था पाहता तो काही तास पाण्यात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Quepem Canal Dead Body Found
Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

पोलीस तपासाचे चक्र सुरू

या घटनेची नोंद करून केपे पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. मृत व्यक्ती कोण आहे, ती कुठून आली होती आणि तिचा मृत्यू नेमका कसा झाला, या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपात (हत्या), यादृष्टीने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Quepem Canal Dead Body Found
Pharmacy Strike Goa: राज्यातील औषधांची सर्व दुकाने 20 रोजी राहणार बंद; रुग्णालयांतील आस्थापने मात्र राहणार सुरू

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तसेच, परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचीही पोलीस पडताळणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com