Pharmacy Strike Goa: राज्यातील औषधांची सर्व दुकाने 20 रोजी राहणार बंद; रुग्णालयांतील आस्थापने मात्र राहणार सुरू

E Pharmacy Rules India: ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स ॲण्ड ड्रगिस्ट्स’ने (एआयओसीडी) औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात आणि किरकोळ विक्रेत्यांवर ई-फार्मसींचा वाढता प्रभाव.
 E Pharmacy Rules India
E Pharmacy Rules IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स ॲण्ड ड्रगिस्ट्स’ने (एआयओसीडी) औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात आणि किरकोळ विक्रेत्यांवर ई-फार्मसींचा वाढता प्रभाव, याविरोधात २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन ‘केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ने केले आहे. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष अमित कामत, सरचिटणीस प्रसाद तांबा, कोषाध्यक्ष यतीन नाईक, केदार जिरगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कामत म्हणाले, की कोरोना काळात ऑनलाईन औषध विक्रीला सरकारने तात्पुरती मान्यता दिली होती; परंतु तो व्यवसाय अद्याप बंद झालेला नाही.औषध विक्रेत्यांनी वारंवार सरकारकडे ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मागणी केली आहे; पण त्याची गंभीरपणे दखल घेतलेली नाही. केंद्र सरकारला पुन्हा आठवण करून देण्यासाठीच या देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.

 E Pharmacy Rules India
Goa Drug Case: 61 व्या दिवशी आरोपपत्र संशयिताच्या पथ्यावर, ड्रग्स प्रकरणात साहील खानला 'डिफॉल्ट जामीन'

देशभरातील १२ लाख ४० हजार औषधालये यात सहभागी होतील. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषधालयांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रचंड सवलती, ऑफलाईन विक्रेत्यांसाठी बाजारातील असमान स्थिती आणि योग्य वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची पडताळणी न करताच औषधांची केली जाणारी कथित विक्री यांसारख्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औषधालयांची देशभरात मोठी विक्री साखळी असणाऱ्या कंपन्यांनाही या संपात सहभागी होण्याचे संघटनेने आवाहन केले आहे.

‘एफडीए’ही निष्प्रभ

तांबा म्हणाले, की २० मे रोजी रुग्णालयांमधील औषधालये सुरू राहणार असून बहुतांश औषधांची दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. ऑनलाईन औषध विक्री व्यवहारावर ‘एफडीए’लाही कारवाई करता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com