Quepem News : विकासकामे केली नाहीत, म्हणूनच बाबू पडले!

एल्टनचा बाण : केपेतील विकासकामांत मुद्दामहून खो घातला जात असल्याचा आरोप
Quepem mla Altone D'Costa criticized former mla babu Kavlekar
Quepem mla Altone D'Costa criticized former mla babu Kavlekar Gomantak Digital Team

Quepem News : जनतेने केपेचा विकास करण्यासाठी ज्यांना सतत 20 वर्षे निवडून दिले, त्यांच्याकडून कामे होत नसल्याचे पाहूनच लोकांनीच केपेत बदल घडवून आणला, अशी टीका केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी केली मतदारसंघातील कामे माजी आमदार बाबू कवळेकर अडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्‍यांनी त्‍यांचे नाव न घेता केला

केपे तालुक्यात येणाऱ्या सहा ठिकाणी रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविकांची पदे माजी आमदाराने अडवलेली आहे. मी गरजवंतांना त्या नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला होता. पण आज या गरीब जनतेवर अन्याय होत असल्याचा पाहून खूप दु:ख वाटत असल्याचे डिकॉस्टा यांनी सांगितले.

Quepem mla Altone D'Costa criticized former mla babu Kavlekar
Quepem News : अर्धवट प्रकल्प; कुडचडे स्टेशन रोडवर पुराची भीती

केपे मतदारसंघातील खड्डे येथे पारंपरिक मांड व‌ पदपथाच्या उद्‍घाटनप्रसंगी डिकॉस्‍टा बोलत होते. यावेळी अडणे-बाळ्ळीचे सरपंच गोविंद देसाई, उपसरपंच बिंदिया गावकर, पंचसदस्य महेंद्र गावकर, नविता फळदेसाई, हर्षद परीट, प्रभाकर गावकर, माजी सरपंच भामटू वेळीप व‌ मान्‍यवर उपस्थित होते.

मी राजकारणात पैसे कमवण्यासाठी आलेलो नाही, तर गरीब लोकांचे हित साधण्‍यासाठी आलोय. जेव्हा त्यांना माझी गरज भासते, तेव्हा त्यांच्यासाठी उपलब्ध असणे, हे माझे कर्तव्य आहे, असे आमदार डिकॉस्टा यांनी सांगितले.

Quepem mla Altone D'Costa criticized former mla babu Kavlekar
Quepem news : पक्षकार्य तळागाळात पोचवा : सदानंद शेट तानावडे

सहकार्यामुळेच विकास

यावेळी सरपंच गोविंद फळदेसाई म्हणाले, आमदार एल्टन डिकास्टा यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत आहे. त्यांच्यामुळेच मला सरपंच होण्याचा मान मिळाला. उपसरपंच बिंदिया गावकर म्हणाल्या, माझ्या प्रभागात झालेल्या कामाचे श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये. आमदार डिकॉस्टाच्या सहकार्याने माझ्या प्रभागातील संपूर्ण विकास करून घेतला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com