Quepem News : कुशावती नदीलाही पूर, रस्त्यांवर पाणी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

विद्यार्थिनी मेघना उमेश गाड म्हणाल्या, सोमवारपासून आम्हांला कॉलेजमध्ये जाता आले नाही.
Quepem News
Quepem NewsDainik Gomantak

केपे : मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आल्याने आज सकाळी ११.३० वा. पारोडा येथील पूल व मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरून होणारी वाहतूक दुपारी १२.४५ वा. चांदरमार्गे वळविण्यात आली. दरवर्षीप्रमाणे आज सकाळी पारोडा गावाला जोडणारा कुशावती नदीवरील पूल पाण्याखाली गेला.

मडगाव ते केपे हा मुख्य रस्ता सुद्धा पर्वत परोडा येथे काही प्रमाणात पाण्याखाली गेल्याने अखेर या रस्त्यावरून होणारी वाहतूक कट्टा अमोणा ते चांदरमार्गे वळविण्यात आल्याचे केपे पोलीस वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज मळीक यांनी सांगितले. पर्वत पारोडा येथे मुख्य रस्त्यावरही पाणी आले.

Quepem News
Quepem News : सरकारी शाळेतील शिक्षकाने घडवली आदर्श शाळा | Gomantak TV

कडशी-मोपा पुलावर पाणी

पेडणे तालुक्यातील कडशी-मोपा येथील एकूण दहा कुटुंबीयांसाठी उभारलेला कडशी नदीवरील पद पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. मागच्या पाच दिवसापासून या भागातील शाळकरी कॉलेज मुले विद्यालयात गेली नाहीत. शिवाय इंटरनटसेवा विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आपत्कालीन सेवा विभाग या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. या भागात इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली आहे. रानटी जनावरापासूनही या कुटुंबीयांना धोका संभवत असतो. सरकारने हा पदपुलाची उंची वाढवण्याची गरज होती. परंतु तज्ञ मंडळींनी भविष्याचा विचार न करता पदपूल उभारला, निदान यापुढे तरी या पुलाची उंची वाढवण्यासाठी मागणी केली आहे.

Quepem News
Quepem News : अर्धवट प्रकल्प; कुडचडे स्टेशन रोडवर पुराची भीती

कडशी-मोपा येथील पलीकडे एकूण दहा कुटुंब आपापला व्यवसाय आपापला व्यवहार करून वास्तव्य करत असतात. या दहा कुटुंबापैकी दहा मुले त्या भागातून पेडणे शहरातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येतात. परंतु सोमवारपासून या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. या पुलावरून येणे म्हणजे जिवाला धोका आहे.

कडशी नदीवर पदपूल जमिनीपासून काही अंतरावरच आहे. उंचीने कमी असल्यामुळे नदीला पूर आल्यानंतर पुलावर पाणी येते. पाणी वाढल्यानंतर पूल कुठे आहे, हेच कळत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना या परिसरात येणेही धोक्याचे आहे. चारही बाजूने मुख्य रस्ता जोडला जाणार आहे. रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पुढे जाताच येत नाही.

Quepem News
Quepem news : पक्षकार्य तळागाळात पोचवा : सदानंद शेट तानावडे

गव्यांची भीती

विद्यार्थिनी मेघना उमेश गाड म्हणाल्या, सोमवारपासून आम्हांला कॉलेजमध्ये जाता आले नाही. इंटरनेट सेवा विस्कळीत झालेली आहे. मोबाईलही चालत नाही. शिवाय रात्रीच्या वेळी गवे या भागात फिरतात. विजेचा लपंडावही सुरू असतो. त्यामुळे रात्री घरातून बाहेर पडणे देखील शक्य नाही. सरकारने यावर योग्य ती उपाययोजना करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com