Chandreshwar Temple: प्राचीन चंद्रेश्वर मंदिर स्थळाची पाहणी करा! गोवा खंडपीठाचा आदेश; सौंदर्यीकरणाच्या नावावर डोंगरकापणीचा आरोप

Chandreshwar Bhutnath Temple Paroda: १९७८ च्या प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष कायद्याअंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून देखील याला घोषित करण्यात आला आहे.
love relationship court case
love relationship court caseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केपे तालुक्यातील ऐतिहासिक चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर परिसरातील कामांमुळे झालेल्या कथित नुकसानीबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर भूमिका घेतली असून या स्थळाची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

महाजन आदित्य राऊत देसाई यांनी दाखल केलेल्या या जनहित याचिकेत मंदिराच्या ‘सौंदर्यीकरण आणि उन्नतीकरण’ या नावाखाली करण्यात आलेल्या बांधकामामुळे डोंगराची मोठ्या प्रमाणावर कापणी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या कामांमुळे डोंगराला भेगा पडल्या असून प्राचीन संरक्षित स्मारक धोक्यात आल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

चंद्रेश्वर मंदिर असलेला डोंगर पारोडा गावातील सर्वे क्रमांक ८५/६ मध्ये स्थित आहे. १९७८ च्या प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष कायद्याअंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून देखील याला घोषित करण्यात आला आहे.

love relationship court case
Goa Chandreshwar Temple: चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; दोन्ही सुरक्षारक्षक गैरहजर

याचिकेच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी छायाचित्रे व लेखी मांडणी सादर करून नुकसानीचा पुरावा सादर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने अनुच्छेद ४९ अंतर्गत राज्यावर असलेल्या घटनात्मक कर्तव्याची आठवण करून दिली.

love relationship court case
Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण करणे ही केवळ पुरातत्त्व विभागाची जबाबदारी नसून देवस्थान आणि संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचीही सामूहिक जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com