Quepem : जुआरी नदीवर रेल्वे पुलाचं बांधकाम; माती बागायतीत गेल्याने सुपारी, आंब्याच्या झाडांचं नुकसान

भरपाईची मागणी : विश्‍वासात घेतले नसल्याचा कामराळच्या नागरिकांचा आरोप
Curchorem
Curchorem Dainik Gomantak

केपे : दक्षिण गोव्यात सध्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू असून धडे - सावर्डे येथील जुआरी नदीवर नवीन पूल बांधला गेला आहे. या पुलावर रेल्वे रुळ घालण्यासाठी कामराळ येथे संरक्षक भिंत उभारून हजारो ट्रक मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ही माती पुलाजवळ असलेल्या लोकांच्या बागायतीत गेल्याने त्यांच्या बागायतींचे नुकसान झाले आहे.

रेल्वेने कामासाठी खोदून ठेवलेली माती बागायतीत गेल्याने आपली सुपारी, माड व आंब्याची झाडे मरून गेल्याचे अशोक नाईक यांनी सांगितले. सुपारीचे एक झाड वर्षाकाठी किमान पाच हजार रुपयांचे उत्पन्न देते, असे त्यांनी सांगितले.

Curchorem
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; जाणून घ्या आजचे इंधनाचे दर

पुलाचे काम करताना अनेकवेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगून पाहिले, पण ते लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आता पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे व बागायतीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात माती असून ती पावसात बागायतीत येऊन बागायतीचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे ही माती तेथून काढून टाकावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

Curchorem
Development League Football : एफसी गोवा, वेळसाव मुख्य फेरीसाठी पात्र

कामराळ - कुडचडे येथे जमिनीचे रेखांकन न करता रस्त्याचे काम केले जात असून लोकांना आपली किती जमीन रेल्वेने संपादित केली आहे ते आतापर्यंत कळले नसल्याने लोकांनी या कामाविषयी प्रश्नचिन निर्माण केले आहे. आमच्या जमिनीत रेल्वेने काम सुरू केले असून अद्याप आम्हाला कोणतीही नुकसान भरपाई किंवा जमिनीची किंमत दिलेली नाही, असे अशोक नाईक यांनी सांगितले.

‘भविष्यात गंभीर स्थिती’

जुआरी नदीवर जो नवीन पूल उभारण्यात आला आहे त्याच्या बाजूला खाली नदीवर जाण्यासाठी रस्ता न ठेवल्याने भविष्यात रेल्वेला गंभीर अपघात झाल्यास पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता न ठेवल्याने गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असे अशोक नाईक यांनी सांगितले. रेल्वे अधिकारी व कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी लोकांच्या समस्या दूर करून लोकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com