Goa Congress: सरकारी वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करा! पाटकर यांचा इशारा

Amit Patkar: सार्वजनिक बांधकाम खात्याचा इमारतीला घातला घेराव
Amit Patkar: सार्वजनिक बांधकाम खात्याचा इमारतीला घातला घेराव
Goa Congress Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

वारसा इमारतींसह सरकारी वास्तूंच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. यातून भाजप सरकार सामान्यांविषयी असंवेदनशील दिसून येते.साबांखाने सर्व इमारतींचे बांधकामांचे ऑडीट करावे व त्यांची दुरुस्ती हाती घ्यावी. अन्यथा कॉंग्रेस पक्ष त्यासाठी आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘साबांखा’चे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांना दिला.

सरकारी कार्यक्रमांवर खर्चण्यासाठी कोट्यवधी आहेत, पण सरकारी नोकर राहत असलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकारकडे निधी नाही,अशी टीकाही केली. अमित पाटकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी आल्तिनो येथील ‘साबांखा’ संचालनालयाच्या इमारतीत पार्सेकर यांना घेराव घातला.

यावेळी ॲड. श्रीनिवास खलप, विशाल वळवईकर, विवेक डिसिल्वा, राजन घाटे व इतर पदाधिकारी होते. शिष्टमंडळ पार्सेकरांच्या कक्षात गेले तेव्हा ते गाणे ऐकत होते, याबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. सरकारी इमारतींकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पाटकर यांनी पार्सेकर यांना जाब विचारला.

Amit Patkar: सार्वजनिक बांधकाम खात्याचा इमारतीला घातला घेराव
Goa Pradesh Mahila Congress : ‘मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजने’वर महिला काँग्रेसचा तीव्र आक्षेप : बीना नाईक

जीर्ण सरकारी वास्तूंकडेच दुर्लक्ष !

नीलेश काब्राल यांच्याकडे ‘साबांखा’ होते तेव्हा त्यांनी उत्तरात मडगावचे माथानी साल्ढाना प्रशासकीय संकुल, हॉस्पिसियो हॉस्पिटल, रवींद्र भवन, जुनी गोमेकॉ इमारत आणि मॅकिनेज पॅलेस, अशा इमारती जीर्ण झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. दुर्दैवाने या वास्तूंच्या दुरुस्तीसाठी भाजप सरकारने काहीही केले नसल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com