Dharmesh Saglani: मुख्यमंत्र्यांची भेट हवी? माझ्याबरोबर या!

सगलानींचा युवकांना सल्ला : नोकरीचे आश्वासनही मिळणार
Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election
Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa ElectionDainik Gomantak

Sanquelim Municipal Elections 2023: साखळी नगरपालिका क्षेत्रातील लोकांना जर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट हवी असल्यास त्यांनी थेट आपल्यासोबत प्रचाराला फिरावे.

त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांशी त्यांना बोलण्याची संधी मिळणार, नोकरीचेही आश्वासन मिळणार, असा उपहासात्मक सल्ला धर्मेश सगलानी यांनी देत आपला अनुभव टीकेतून व्यक्त केला.

सध्या साखळीत सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात भाजपच्या कार्यकर्ते व नेत्यांकडून बराच दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे आपण कोणालाही बरोबर न घेता एकटाच फिरत आहे. आपणास मोठी फौज घेऊन लोकांना आकर्षित करण्याची गरज नाही.

साखळीत गेली दहा वर्षे आपण केलेल्या कामांची लोकांना जाणीव आहे. त्यामुळे लोकांना आपली ओळखही दाखवून देण्याची गरज भासत नाही. लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, असे सगलानी यांनी सांगितले.

Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election
GMC च्या बालरोग वॉर्डच्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय, सेसिल यांनी व्हिडिओ करत राणेंना केले आवाहन

धर्मेश सगलानी बरोबरच टुगेदर फॉर साखळीचे उमेदवार सुनिता वेरेकर, कुंदा माडकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनीही आपले अनुभव कथन केले.

हा तर केवळ राजकीय स्टंट : भाजप

साखळीत भाजपच सर्व दहा जागांवर विजय संपादन करणार आहे. याची कुणकुण विरोधकांना लागली असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यासाठीच हे विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. केवळ राजकीय सहानुभूती मिळविण्याचा हा राजकीय स्टंट आहे.

टीका करणाऱ्या नेत्यांनी यापूर्वी निवडणुका लढवल्या आहेत. त्यावेळी त्यांना अशाप्रकारचा अनुभव कधीच आला नव्हता का? आताच हा अनुभव येण्याचे कारण काय? असा सवाल भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर व सरचिटणीस कालिदास गावस यांनी उपस्थित केला.

Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight in Goa Election
Mopa Taxi Counter : कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार; आंदोलकांचा इशारा

"लोकशाहीप्रधान राज्यात भाजपचे नेते दडपशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते बरोबर नसून त्यांना महागात पडणार आहे. हा अनुभव सध्या सर्वच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना येत आहे. यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून ही दडपशाही बंद करावी. विजयाची खात्री असल्यास अशा प्रकारचा प्रयत्न का होत आहे?"

- सुनिता वेरेकर, उमेदवार

"आपण यापूर्वी दोन निवडणुका लढवून विजयीही झाले, परंतु यावेळी येत असलेला अनुभव हा वेगळाच आणि वाईट आहे. आपल्या समवेत फिरणाऱ्यांना थेट फोन येतात. विविध प्रकारच्या धमक्या व दबाव टाकला जात असल्याने आपण आता पतीलाच घेऊन प्रचाराला फिरत आहे."

- कुंदा माडकर, उमेदवार

"साखळीतील भाजपने सध्या चालविलेली दडपशाही लोकशाहीला अत्यंत घातक आहे. ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर लढायची असते, परंतु भाजपने ती पक्ष पातळीवर करून त्यात पक्षीय राजकारण आणले आहे. त्यामुळेच यात आता दडपशाही वाढली आहे. आता तर आमच्या कार्यकर्त्यांना सीआयडीचे फोन येऊ लागले आहेत. याचा वचपा लोक मतदानातून काढणार आहेत."

- प्रवीण ब्लेगन, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com