Goa Bjp: मणिपूर विषयावर विरोधकांना चर्चा नकोच होती - तानावडे

मणिपुरातील हिंसाचारामुळे शाळा बंद पडल्याने तेथे ऑनलाईन शिक्षणाची सोय केली आहे.
Sadanand Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Sadanand Tanavade मणिपूरच्या विषयावर संसदेत विरोधकांना चर्चा करायचीच नव्हती, त्यांना राजकारण करायचे होते, असे नवनिर्वाचित राज्‍यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी आज येथील भाजपच्या मुख्य कार्यालयात पहिली पत्रकार परिषद घेतली.

मणिपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सेना दलांच्या संपर्कात आहेत असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

आपण खासदारकीची शपथ घेतल्यानंतर संसदेच्या अधिवेशनात सहभागी झालो. संसदेत विरोधक मणिपूरच्या विषयावर चर्चेची मागणी करत होते. राज्यसभा अध्यक्षांनी या चर्चेसाठी अमर्याद वेळ देण्याचे मान्य करूनही विरोधक चर्चा करत नव्हते.

लोकसभेतही तशीच स्थिती होती. मंत्री बोलण्यास उठले की विरोधक केवळ ‘मणिपूर...मणिपूर’ म्हणायचे. त्यांना या विषयावर चर्चा करायची नव्हतीच, तर केवळ राजकारण करायचे होते, असे तानावडे म्‍हणाले. दरम्‍यान, या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळयेकर हेही उपस्‍थित होते.

Sadanand Tanavade
Goa DIG Koan Suspended: गोव्यात पबमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणारे IPS अधिकारी कोण आहेत?

विरोधक उपांत्य फेरीतच झाले गारद

विरोधकांनी याआधी केंद्र सरकारवर अविश्वास ठराव आणला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढतील. दिल्लीसंदर्भातील विधेयकावर राज्यसभेत सरकारचा पराभव करण्याचे स्वप्न विरोधक पाहत होते.

त्यासाठी ते त्यास सत्तेचा उपांत्य सामना तर अविश्वास ठरावाला अंतिम सामना संबोधत होते. मात्र विरोधकांचा पराभव झाला आणि विरोधक उपांत्य फेरीतच गारद झाले, असा टोला तानावडे यांनी लगावला.

Sadanand Tanavade
Goa Forward Party: राज्‍य हिताविरोधातील निर्णयांना विरोध करण्याची CM मध्ये धमक नाही

30 हजार मेट्रिक टन धान्य मणिपूरला रवाना

मणिपुरातील हिंसाचारामुळे शाळा बंद पडल्याने तेथे ऑनलाईन शिक्षणाची सोय केली आहे. हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे.

तेथील जनतेची भूक भागण्यासाठी 30हजार मेट्रिक टन अन्नधान्य पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्‍सिंगच्या माध्यमातून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित करणाऱ्या सेना दलांच्या संपर्कात आहेत, असे तानावडे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com