Purple Festival Goa Song: प्रसिद्ध गीतकार-कवी जावेद अख्तर यांनी लिहिले 'पर्पल फेस्टिवल'चे अनोखे गीत!

गीताचे संगीत दिग्दर्शन मन्नान शाह यांनी केले आहे आणि दिव्यांग व्यक्तींनी उद्घाटन समारंभात ते सादर केले
Purple Festival Goa 2024 Song by Javed Akhtar
Purple Festival Goa 2024 Song by Javed AkhtarDainik Gomantak
Published on
Updated on

Purple Festival Goa 2024 Song by Javed Akhtar

कालपासून (8 जानेवारी) पणजीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध गीतकार आणि कवी, जावेद अख्तर यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठी गीत लिहिले आहे. या गीताचे संगीत दिग्दर्शन मन्नान शाह यांनी केले आहे आणि दिव्यांग व्यक्तींनी उद्घाटन समारंभात ते सादर केले आहे.

Purple Festival Goa 2024 Song by Javed Akhtar
Goa Daily News Wrap: खून प्रकरणातील ठळक घडामोडी, पाऊस, आंदोलन आणि दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

काल पणजीतील महोत्सवाच्या उद्घाटनावेळी या गीताने पदार्पण केले. यावेळी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना अतिशय हृदयस्पर्शी संदेश दिला. ते म्हणाले की, पर्पल फेस्टिवलसारख्या अतिशय अनोख्या आणि खास महोत्सवासाठी मला गीत लिहिण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. सोबतच त्यांनी अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना सर्वांनी योग्य न्याय देण्याचे आवाहनही केले.

यावेळी त्यांनी हेलन केलर, बीथोव्हेन, विचारवंत, लेखक आणि संगीतकार यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हलचा उद्देश दिव्यांग व्यक्तींबद्दलचे गैरसमज दूर करणे हा आहे. त्यामुळे आपणही आपल्या या खास भाऊ-बहिणींना सोबत घेऊन पुढे जाऊया.

हे फेस्टिवल सहा दिवस म्‍हणजे 13 जानेवारीपर्यंत चालणार असून या महोत्सवात जगभरातून सुमारे साडेसहा हजार दिव्यांग तर साडेअकरा हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पर्पल फेस्टिव्हलची ठळक वैशिष्‍ट्ये

  • सुमारे ६५०० दिव्यांगांचा सहभाग

  • ४५ एनजीओ करणार प्रतिनिधित्व

  • ‘दिव्यांग’ विषयावर ३० परिषदा

  • विविध प्रकारचे २०० स्टॉल्स

  • १८० दिव्यांगप्रेरित सिनेप्रदर्शन

  • दिव्यांगांना मोफत उपकरणांचे वाटप

  • २५०० दिव्यांग क्रीडापटू दाखल

  • ११,५००हून अधिक प्रतिनिधींची नोंदणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com