Purple Fest 2025: पणजीत रंगणार ‘पर्पल फेस्ट’! काय आहेत तारखा? कार्यक्रमांचा तपशील जाणून घ्या..

Purple Fest: ग्रामीण समावेशन’ हा यावर्षीचा मुख्य विषय असून, गावपातळीवरील अनुभव आणि आवाज मांडण्यासाठी प्रथमच ग्रामीण ‘पर्पल ॲम्बेसेडर्स’ची निवड करण्यात आली आहे.
Purple Fest 2025
Purple FestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीत आंतरराष्ट्रीय ‘पर्पल फेस्ट २०२५’ यंदा ९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान रंगणार असून, यामध्ये १० हून अधिक देशांचा सहभाग असेल. संयुक्त राष्ट्रसंघ सहआयोजक म्हणून सहभागी झाल्याने या महोत्सवाला जागतिक ओळख मिळाली आहे.

ग्रामीण समावेशन’ हा यावर्षीचा मुख्य विषय असून, गावपातळीवरील अनुभव आणि आवाज मांडण्यासाठी प्रथमच ग्रामीण ‘पर्पल ॲम्बेसेडर्स’ची निवड करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले, की यावर्षीच्या फेस्टमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रथमच स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंगसह साहसी खेळांचा अनुभव देण्यात येणार आहे. शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, सामाजिक समावेशन अशा विविध विषयांवरील परिषदाही होणार आहेत. यामध्ये धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि अपंग व्यक्ती स्वतः सहभागी होऊन उपाययोजना सुचवतील.

फेस्टमध्ये पर्पल रेन मैफली, चित्रप्रदर्शन, चित्रपट प्रक्षेपण आणि समावेशक सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे प्रतिभेला वाव मिळणार आहे. दिव्यांग व्यक्ती केवळ सहभागी म्हणून नव्हे तर कलाकार, नेते आणि सर्जक म्हणून समाजात महत्त्वपूर्ण योगदान देतात, हा संदेश या उपक्रमांतून दिला जाणार आहे.

फेस्टदरम्यान वाहतूक, निवास, स्वयंसेवकांची मदत, साहाय्यक साधनांचा वापर अशा सर्व स्तरांवर प्रवेशयोग्यतेची काळजी घेण्यात आली आहे. साहसी खेळांमध्येही सुरक्षा आणि सोयीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, दृष्टीदोष असलेल्यांसाठी ब्लूटूथ बीकन्सद्वारे अंतर्गत मार्गदर्शन, मोबाईल ॲपवर ध्वनिवर्णन सेवा, संकेतभाषा दुभाषे आणि तत्काळ भाषांतराची सुविधा उपलब्ध असेल. अधिकृत फेस्ट ॲपद्वारे सर्व सोयींचा लाभ घेता येईल. या फेस्टसाठी विशेष अनुकूल रचनेची वाहने उपलब्ध असतील, ज्यामध्ये व्हीलचेअर वापरणाऱ्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षित प्रवास करता येईल.

Purple Fest 2025
Purple Fest: आमीरसोबत 'सितारे जमीन पर'ची टीम येणार गोव्यात? कलाकारांना केले आवाहन; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

महोत्सव स्थळी सुविधा

महोत्सव स्थळी रॅम्प, लिफ्ट, मजबूत फरशी, स्पर्शाधारित टाईल्स, आधार रेलिंग आणि सुलभ शौचालये उपलब्ध असतील. व्हीलचेअरची सोय केली आहे. याशिवाय पर्पल महोत्सव संकेतस्थळ आणि दूरध्वनीवरील मार्गदर्शन यामुळे सहभागींचे मार्गदर्शन सोपे होईल. कार्यक्रमांना सांकेतिक भाषा दुभाषे, थेट लेखन, श्रवण-दृष्टी अडथळ्यांसाठी साधने उपलब्ध करून दिली जातील.

Purple Fest 2025
Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हलचा बिगुल! शुभा मुद्गल, गीता चंद्रन यांची उपस्थिती; तारखा जाणून घ्या..

प्रमुख आकर्षणे

विचारमंथन सत्रे : दिव्यांगांचे रोजगार, शिक्षण, ग्रामीण समस्या, महिला दिव्यांगांचे प्रश्न आदींवर चर्चा.

परिषद : हक्क, कायदे, वित्तीय मदत, उच्च शिक्षणातील समावेशकता, नेतृत्व या विषयांवरील सत्रे. क्रीडा स्पर्धा : अंध क्रिकेट, व्हीलचेअर क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, बोसिया कप यांसारख्या स्पर्धा.

सांस्कृतिक कार्यक्रम : संगीत, नृत्य, कला प्रदर्शन, थेट कलादर्शन, दृष्टिहीन छायाचित्रण, स्पर्शाधारित कला आदी उपक्रम. अनुभव क्षेत्र : डिजिटल सुलभता, शिक्षण, बँकिंग सेवा, सामाजिक उपक्रम आणि सहानुभूती वाढविणारे प्रत्यक्ष अनुभव.

मनोरंजन उपक्रम : पॅरासेलिंग, जेट बोट, जलतरणातील स्कुबा अनुभव, झुंबा नृत्य, बोट प्रवास, पक्षीनिरीक्षण, सायकल सफर आदी कार्यक्रम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com