Bicholim Municipalityला अखेर जाग डिचोलीतील पत्र्यांचे गाळे हटविणार

Bicholim Municipality: पालिका मुख्याधिकाऱ्यांनी अन्य अधिकाऱ्यांना आदेशही दिले आहे.
Bicholim Market
Bicholim MarketDainik Gomantak

Bicholim: बाजारात पत्र्यांच्या गाळ्यांचा घुसखोरीचा प्रकार उजेडात आल्‍याने नगरपालिका खडबडून जागी झाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन हे गाळे मोडून टाकण्‍यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्‍या आहेत. तसा आदेशही पालिका मुख्याधिकाऱ्यांनी अन्य अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे लवकरच हे गाळे हटविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

पालिकेला कधीतरी हे गाळे काढावेच लागणार होते. मात्र काही भाजीविक्रेत्यांनी या बेकायदा गाळ्यांबाबत तक्रार केली. त्‍यानंतर या घुसखोरीच्‍या प्रकाराकडे लक्ष गेले असून आता हे गाळेच मोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी मार्केट निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत या गाळ्यांची पाहणी करून गाळे काढण्याबाबतचे सोपस्कार हाती घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Bicholim Market
Artist in Goa : संतुरवादनात डॉक्टरेट मिळालेला एकमेवाद्वितीय गोमंतकीय कलाकार

नवीन बाजार संकुल इमारत प्रकल्प उभारण्यासाठी गणपती पूजन मंडपाच्या मागील बाजूचे गाळे चार वर्षांपूर्वी मोडण्यात आले होते. त्‍यानंतर मासळी मार्केटजवळ पत्र्यांचे गाळे उभारून पीडित गाळेधारकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. नवीन इमारत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 24 पैकी 18 गाळेधारकांनी नवीन इमारतीत स्थलांतर करून व्यवसाय सुरू केला आहे. तर, तांत्रिक कारणामुळे अन्य गाळेधारकांचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे.

Bicholim Market
Goa CM Pramod Sawant : कामचुकार सरकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे खडे बोल; म्हणाले...

भाजीविक्रेत्यांचे बस्तान: गाळेधारकांनी नवीन इमारतीत स्थलांतर केल्याने पत्र्यांचे गाळे रिकामे झाले होते. मात्र यातील काही गाळ्यांमध्‍ये अन्‍य काही भाजीविक्रेत्यांनी घुसखोरी केली होती. या गाळ्यांनी भाजीही ठेवण्यात येत होती. भाजीवाल्यांनी गाळ्यांना टाळेही लावली होती. त्यामुळे बाजारात हा चर्चेचा विषय बनला आहे. या गाळ्यांनी भाजीवाल्यांना सामान ठेवण्यासाठी कोणी अधिकार दिलेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराचीही चौकशी होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com