Goa Politics: जिल्हा इस्‍पितळात सुविधा द्या

Goa Politics: 30 मेपर्यंत मुदत: मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, सरदेसाईंकडून पाहणी
Vijai Sardesai on Salary Certificate
Vijai Sardesai on Salary CertificateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळातील वैद्यकीय सुविधा वाढवाव्‍यात, अशी मागणी गोवा फॉरवर्डने मुंबई उच्‍च न्‍यायालयात केली होती. या याचिकेनुसार 30 मेपर्यंत हे इस्‍पितळ सर्व सुखसोयींनी सज्‍ज करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आज विजय सरदेसाई आणि या पक्षाचे इतर पदाधिकाधिकाऱ्यांनी काही नागरिकांसह या इस्‍पितळाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. या इस्‍पितळात डॉक्‍टर आणि अन्‍य कर्मचाऱ्यांची भरती करण्‍यासाठी सरकारने त्‍वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी यावेळी सरदेसाई यांनी केली.

घटनेच्‍या 21 व्‍या कलमानुसार चांगली आरोग्‍य सेवा मिळणे हा कुठल्‍याही नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात सुविधा अभावी नागरिकांना योग्‍य ती सेवा मिळत नव्‍हती.

Vijai Sardesai on Salary Certificate
Goa And World Bank MoU: 1650 कोटींच्या हवामान निधीसाठी गोव्याचा करार

त्‍यामुळेच हा प्रश्‍न आपल्‍याला न्‍यायालयापर्यंत न्‍यावा लागला. त्‍यानंतर न्‍यायालयाने जो निकाल दिला आहे तो ऐतिहासिक स्वरूपाचा असून हा आपला नव्‍हे, तर संपूर्ण दक्षिण गोव्‍यातील लोकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

सरदेसाई म्हणाले, जनतेला चांगली आरोग्य सेवा प्रदान करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. न्यायालयाने सरकारला २० एप्रिलपर्यंत याचा अहवाल तयार करून तो न्‍यायालयात सादर करण्‍याचा आदेश दिला आहे. या रुग्णालयातील सर्व प्रलंबित कामे 30 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Vijai Sardesai on Salary Certificate
Mormugao Municipality: मुरगाव पालिका बैठकीत गाजला ‘कोळसा’

या इस्‍पितळात आयसीयू सुविधा, एमआरआय आणि सीटीस्‍कॅन सुविधा, सुसज्‍ज रक्‍तपेढी या सुविधा उपलब्‍ध नसल्‍याने तसेच अन्‍य गोष्‍टींबाबतही आबाळ असल्‍याने गोवा फॉरवर्डने उच्‍च न्‍यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

या इस्‍पितळात रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्‍याकडेही दुर्लक्ष केले जात असल्‍याचे या याचिकेत म्‍हटले होते. या इस्‍पितळाजवळ रिक्षा स्टँड, मोटरसायकल पायलट स्टँड आणि इतर सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात अशीही त्‍यांनी मागणी केली होती. न्‍यायालयाने या मागण्‍या मान्‍य केल्‍याने लोकांना आता दिलासा मिळणार असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com