चाव्या मिळेपर्यंत आंदोलनातून माघार नाही; ‘गोमेकॉ’समोरील आंदोलक

गोमेकॉसमोरील निराश्रीत विक्रेत्यांचे धरणे आंदोलन आज (रविवारी) पंधराव्या दिवशीही कायम आहे.
Protest
ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Protest: गोमेकॉसमोरील निराश्रीत विक्रेत्यांचे धरणे आंदोलन आज (रविवारी) पंधराव्या दिवशीही कायम आहे. जोवर गाळ्यांच्या चाव्या मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनातून माघार नाही हा त्यांचा निर्धार आहे. जागा निश्‍चिती जाली असली तरी अद्याप बांधकाम (Construction) प्रक्रीया सुरू नाही, त्यामुळे आंदोलकांचा सरकारवर विश्‍वास नाही. कारण गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना आश्‍वासने देऊन झुलवत ठेवण्यात आले आहे.

Protest
भाजपकडून दोन मंत्र्यांना डच्चू; दोघांचे पुनर्वसन

सरकारच्यावतीने (Government) सांताक्रूझ आणि सांत आंद्रेच्या आमदारांनी १९ डिसेंबरपर्यंत दुकानगाळे ताब्यात देण्याचे आश्‍वासन देत उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरी धरणे आंदोलन सुरूच आहे. आता आवघे सरकारच्या मुदतीला १४ दिवस शिल्लक राहिले आहेत, या कालावधीत गाळ्यांचे हस्‍तांतरण न झाल्यास हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. दररोज सकाळी ९ ते १२ यावेळेत विक्रेते धरणेला बसत आहेत. गाळ्यांच्या चाव्या हातात मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांचे मत आहे.

आंदोलन सुरू असले तरी कुणीही सरकार अथवा अन्य पक्षांच्या (Political party) नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलकांना गाळे मिळण्याबाबत शासंकता वाटत आहे. १९ तारखेला गाळे न मिळाल्यास वेगळ्या प्रकारचे आंदोलन हाती घेण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com