भाजपकडून दोन मंत्र्यांना डच्चू; दोघांचे पुनर्वसन

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास एक महिना उरला असताना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता वर्तविली जात आहे..
BJP
BJP Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सरकारकडून विविध योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्याचबरोबर भाजपने (BJP) अन्य राजकीय पक्षांचे आमदार (MLA) व नेत्यांना प्रवेश देण्याचा धडाका लावला आहे आणि त्याला यशही येत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते तसेच उमेदवारीच्या शर्यतीत असलेले अनेकजण संतप्त झाले आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन भाजपला आव्हान देण्याचा विडा उचलल्याने भाजपच्या मतविभाजनाचा फायदा विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज रोजी गोव्यात येत असून राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ फेरबदल तसेच नाराज कार्यकर्त्यांचा आढावा ते घेण्याची शक्यता आहे.

BJP
Goa: भ्रष्ट भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससोबत युती; सरदेसाई

इतर पक्षांतील नेते, कार्यकर्ते व आमदारांना भाजपने प्रवेश देण्यास सुरवात केल्याने भाजप कार्यकर्त्यांत तसेच नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. साळगाव मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंड करून नवा गट स्थापन करून थेट पक्षाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते या कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली व घटनांचा आढावा घेऊन नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना व जनतेशी मोठा संपर्क असलेल्यांना संधी देण्यात येईल, असे घोषित केले होते. मात्र, या भाजपने इतर पक्षाचे आमदार व नेत्यांना आयात करण्यास सुरवात केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजली आहे.

भाजपने राज्यात केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेमध्ये त्यांना स्वबळावर ही निवडणूक लढविल्यास सद्यस्थितीत बहुमत मिळण्याइतपत जागा मिळणे अनुकूल नसल्याचे आढळल्यानेच त्यांनी ज्या मतदारसंघात ज्या नेत्याचे पारडे जड आहे, त्यालाच जाळ्यात ओढण्याची खेळी खेळली आहे. त्यामध्ये भाजप यशस्वी होत आहे. गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) आमदार जयेश साळगावकर यांना भाजपमध्ये आणण्यात यश मिळाल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आमदार विनोद पालयेकर हेही भाजपच्या वाटेवर आहेत. फोंड्याचे आमदार रवी नाईक (MLA Ravi Naik) यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नाईक त्याचवेळी अप्रत्यक्षपणे भाजपवासी झाले होते. त्यांनी काही महिन्यांपासून पणजीतील काँग्रेस कार्यालयातही येणे सोडून दिले होते. भाजप सरकारकडून ते फोंड्यातील कामे करून घेत होते. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्‍चित झाले होते. मंगळवारी ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.

BJP
गोव्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचणार..!

तिघांचा भाजपमध्ये प्रवेश : गोवा फॉरवर्डचे शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, फोंड्याचे आमदार रवी नाईक तसेच मगोच्या 12 निश्‍चित उमेदवारांपैकी एक प्रेमेंद्र शेट यांनाही भाजपने आपल्या जाळ्यात ओढले आहे. फडणवीस यांच्या उपस्थितीत या तिघांचा मंगळवारी (7 डिसेंबर) प्रवेश होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन मंत्र्यांना डच्चू; दोघांचे पुनर्वसन

मगोचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांना फोडण्यात भाजपने यश मिळवले आहे. त्यांना उमेदवारीही देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. त्यामुळे मये मतदारसंघात मगोचा उमेदवार म्हणून आता भाजपचे आमदार प्रवीण झांट्ये यांना उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेट हे भाजपमध्ये आल्यास उमेदवारी मिळण्याची शक्यता अंधूक असल्याने झांट्ये यांनी मगोकडे लक्ष केंद्रित केले आहे.

...तर झांट्ये मगोमध्ये?

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास एक महिना उरला असताना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षविरोधी कारवाया करत असलेले किनारपट्टी भागातील मंत्री तसेच सेक्स स्कँडल प्रकरणामुळे भाजपला ज्या मंत्र्यांमुळे बदनाम व्हावे लागत आहे, अशा या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याजागी भाजपमध्ये प्रवेश करणारे रवी नाईक तसेच भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com